फेब्रुवारी २४ च्या सप्ताहाचा आराखडा
२४ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. १२ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति ३२-३५ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
८ मि: “स्मारकविधीचे आमंत्रण देण्याची मोहीम २२ मार्च पासून सुरू होईल.” सेवा पर्यवेक्षकाद्वारे भाषण. राज्य सभागृहात बसलेल्या सर्वांना आमंत्रणपत्रिका द्या आणि त्यातील माहितीवर चर्चा करा. स्मारकविधीसंबंधी सूचना देण्यासाठी मंडळीच्या वडिलांना जे पत्र पाठवण्यात आले आहे त्यातील ज्या सूचना तुमच्या मंडळीला लागू होतात त्यांची चर्चा करा, आणि क्षेत्र उरकण्याकरता कोणती व्यवस्था करण्यात आली आहे त्याबद्दल सांगा.
२२ मि: “प्रचार करण्याआधी, त्यांना शोधावे लागेल.” प्रश्न व उत्तरे. दिलेली माहिती स्थानिक रीत्या कशी लागू करता येईल ते सांगा. जर तुमच्या मंडळीच्या देखरेखीखाली इतर भाषा बोलणारा एक गट असेल किंवा तुमच्या मंडळीची जी भाषा आहे ती भाषा बोलणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागत असेल, तर परिच्छेद ५ वर चर्चा करताना एक प्रदर्शन दाखवा. शोधकार्य करताना आपण काय म्हणू शकतो हे त्या प्रदर्शनात दाखवा.
गीत १० आणि प्रार्थना