फेब्रुवारी १७ च्या सप्ताहाचा आराखडा
१७ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३७ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. ११ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति २९-३१ (१० मि.)
क्र. १: उत्पत्ति २९:२१-३५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देवाचे वचन प्रेरित आहे—बायबल विषय २३क (५ मि.)
क्र. ३: अब्याथार—बेईमानीच्या केवळ एका कृत्यामुळे अनेक वर्षांची विश्वासू सेवा वाया जाऊ शकते—१ शमु. २२:११-२३; २३:६; २ शमु. १५:२४-३६; १ राजे १:७, ८, २५, २६, ३२-४०; २:२६; ४:४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: प्रचार कार्य करताना प्रेमळपणे बोला. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ ११८, परिच्छेद १ ते पृष्ठ ११९, परिच्छेद ५ वरील माहितीवर आधारित चर्चा.
५ मि: सेवाकार्यात तुम्ही jw.org/mr चा वापर करत आहात का? चर्चा. सेवाकार्यात jw.org/mr चा वापर केल्यामुळे आलेल्या चांगल्या अनुभवांबद्दल श्रोत्यांना विचारा. जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा आपल्या वेबसाईटविषयी लोकांना सांगण्याचे प्रोत्साहन श्रोत्यांना द्या.
१५ मि: “स्मारकविधीच्या काळात तुमचा आनंद द्विगुणित करा!” प्रश्न व उत्तरे. आरोग्याच्या समस्या किंवा कामात व्यस्त असूनही साहाय्यक पायनियरिंग करण्याद्वारे ज्यांनी आपली सेवा वाढवण्याची योजना केली आहे ते आपल्या आराखड्यात कोणकोणते फेरबदल करणार आहेत हे त्यांना विचारा. परिच्छेद ३ वर चर्चा करताना, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांदरम्यान क्षेत्र सेवेच्या सभा घेण्यासाठी कोणत्या योजना करण्यात आल्या आहेत ते सेवा पर्यवेक्षकांना विचारा.
गीत ८ आणि प्रार्थना