फेब्रुवारी १० च्या सप्ताहाचा आराखडा
१० फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २२ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. १० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति २५-२८ (१० मि.)
क्र. १: उत्पत्ति २५:१९-३४ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: बाप्तिस्मा पातके पुसून टाकत नाही—बायबल विषय २४ख (५ मि.)
क्र. ३: मूर्तिपूजा व आज्ञा न मानणे यांबद्दल यहोवाचा दृष्टिकोन (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आपण काय शिकतो? चर्चा. योहान ४:६-२६ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.
१५ मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—आवड दाखवणाऱ्या लोकांच्या नोंदी घ्या.” चर्चा. “हे कसे करावे” या मथळ्याखाली दिलेल्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करताना, या सूचना परिणामकारक का ठरू शकतात हे श्रोत्यांना विचारा.
गीत ४४ आणि प्रार्थना