डिसेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा
९ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. १ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ योहान १-यहूदा (१० मि.)
क्र. १: १ योहान ५:१-२१ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: आज आपण येशू ख्रिस्ताला कोणत्या भूमिकेत पाहावे?—लूक १:३२, ३३; योहान १७:३ (५ मि.)
क्र. ३: देव अब्राहामाच्या विश्वासाची परीक्षा घेतो—बायबल कथा १४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: सन २०१४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला. प्रशाला प्रर्यवेक्षकांचे भाषण. सन २०१४ च्या ईश्वरशासित सेवा प्रशालेसंबंधी दिलेल्या सूचनांचा उपयोग करून तुमच्या मंडळीला ज्या मुद्द्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे त्यांवर भर द्या. नेमलेले भाग प्रामाणिकपणे पूर्ण करण्यास, बायबलचे ठळक मुद्दे या भागात सहभाग घेण्यास आणि सेवा स्कूल पुस्तकातून दर आठवडी दिल्या जाणाऱ्या सल्ल्याचे पालन करण्यास सर्वांना प्रोत्साहन द्या.
१५ मि: “परिणामकारक प्रस्तावना कशा तयार कराव्यात?” प्रश्न व उत्तरे. बायबल काय शिकवते पुस्तक सादर करण्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. पहिले प्रात्यक्षिक परिणामकारक नाही, तर दुसरे परिणामकारक आहे.
गीत २३ आणि प्रार्थना