वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१३ पृ. २
  • “भेट घेण्याचा उद्देश . . . ”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “भेट घेण्याचा उद्देश . . . ”
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—सुरुवातीचे शब्द बोलण्याची तयारी करा
    आमची राज्य सेवा—२०१४
  • इतरांना देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताबद्दल शिकण्यास मदत करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • घरमालकाला ऐकणारे करणाऱ्‍या प्रस्तावना
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आमच्या सादरतेला अनुलक्षून आमची प्रस्तावना जोडणे
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१३
km ११/१३ पृ. २

“भेट घेण्याचा उद्देश . . . ”

घरमालक जेव्हा दरवाजा उघडतो आणि आपल्याला पाहतो तेव्हा आपण कोण आहोत आणि नेमके कशासाठी आलो आहोत असे प्रश्‍न त्याच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रश्‍नांचे निरसन करण्यासाठी आपण सुरुवात कशी करू शकतो? नेहमीप्रमाणे घरमालकाला अभिवादन केल्यानंतर काही प्रचारक “भेट घेण्याचा उद्देश” काय ते सांगतात. जसे की: “आज आम्ही सर्वांना भेटी देतोय, भेट घेण्याचा उद्देश आज एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही लोकांशी बोलतोय; हल्ली अनेक लोक वाढत्या गुन्हेगारीमुळं त्रस्त झाले आहेत. तुम्हाला काय वाटतं . . . ” किंवा मग, घरमालकाची धार्मिक पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन ते असे म्हणतात: “आज आम्ही सर्वांना भेटी देतोय, भेट घेण्याचा उद्देश लोकांना विनामूल्य बायबल अभ्यास देणं.” अगदी सुरुवातीलाच जर आपण स्पष्टपणे सांगितले की आपण का आलो आहोत तर पुढे आपण काय बोलणार आहोत ते घरमालक आणखी चांगल्या प्रकारे ऐकण्याची शक्यता आहे. आपण आपल्या प्रस्तावनेची सुरुवात जर विचारपूर्वक आणि सुज्ञपणे केली तर आपण घरमालकाचे लक्ष वेधू शकू आणि त्यांच्या मनात येणाऱ्‍या शंकांचे निरसन करू शकू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा