प्रश्न पेटी
◼ स्त्री प्रचारक दारात उभी राहून बायबल अभ्यास घेत असेल आणि पुरुष प्रचारक तिच्यासोबत असेल तर स्त्री प्रचारकाने डोक्यावर पदर घेणे गरजेचे आहे का?
स्त्री प्रचारक जर एक नियमित, नियोजित बायबल अभ्यास चालवत असेल आणि तिच्यासोबत पुरुष राज्य प्रचारक असेल तर तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे. (१ करिंथ. ११:३-१०) टेहळणी बुरूज १५ जुलै २००२, पृष्ठ २७ वर असे सांगण्यात आले आहे: “गृह बायबल अभ्यास हा आधीपासूनच योजना केलेला शिकवण्याचा कार्यक्रम असतो ज्यात अभ्यासाचे संचालन करणारी व्यक्ती पुढाकार घेत असते. अशा परिस्थितीत हा अभ्यास मंडळीचाच एक विस्तारित भाग होतो. बाप्तिस्मा घेतलेली ख्रिस्ती भगिनी, बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुष साक्षीदाराच्या उपस्थितीत अभ्यास घेणार असेल तर तिने डोक्यावर पदर घेणे उचित ठरेल.” ही गोष्ट घरात बसून, दारात उभे राहून किंवा इतर ठिकाणी बायबल अभ्यास घेत असतानाही लागू होते.
दुसरीकडे पाहता, जर दारात उभे राहून केला जाणारा बायबल अभ्यास अजून प्रस्थापित झालेला नसेल तर पुरुष प्रचारकासोबत असलेल्या बहिणीने डोक्यावर पदर घेण्याची गरज नाही; मग पुनर्भेट घेण्याचा उद्देश बायबल अभ्यास कसा केला जातो हे दाखवण्याचा असो किंवा अभ्यासाच्या एखाद्या प्रकाशनातून चर्चा करण्याचा असो. सहसा दारात उभे राहून केला जाणारा बायबल अभ्यास हा अनेक प्रगतीशील पुनर्भेटी घेतल्यानंतर हळूहळू प्रस्थापित होतो. त्यामुळे कोणत्या वेळी डोक्यावर पदर घेणे गरजेचे आहे हे ठरवताना प्रचारकांनी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि समंजसपणा दाखवला पाहिजे.