वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१३ पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९०
  • यहोवाच्या मेंढरांना प्रेमळ काळजीची आवश्‍यकता आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • बाप्तिस्मा आणि देवाबरोबर तुमचा नातेसंबंध
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१३
km ७/१३ पृ. ७

प्रश्‍न पेटी

◼ एका बाप्तिस्मारहित प्रचारकाला बाप्तिस्मा घेण्याची अनुमती देण्याआधी त्याची सभांची उपस्थिती व सेवाकार्यातील सहभाग कसा असावा?

बाप्तिस्मा घेणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे, एखाद्या व्यक्‍तीला बाप्तिस्मा घेण्याची अनुमती देण्याआधी त्याला देवाच्या अपेक्षांची पुरेशी समज असणे गरजेचे आहे. याशिवाय, देवाच्या अपेक्षांनुसार जीवन जगण्याचा त्याने निर्धार केला आहे हेदेखील दिसून आले पाहिजे.

ख्रिश्‍चनांनी आपले एकत्र मिळणे सोडू नये अशी आज्ञा त्यांना देण्यात आली आहे. तेव्हा, एक बाप्तिस्मारहित प्रचारक मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत प्रयत्नशील असला पाहिजे. (इब्री १०:२४, २५) तसेच, त्याने सभांमध्ये उत्तरेही द्यावीत. आणि नियम नसला, तरी त्याने शक्यतो ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत सहभाग घ्यावा.

याशिवाय, ख्रिश्‍चनांनी सुवार्तेचा प्रचार करावा व शिष्य बनवण्याचे काम करावे अशीही त्यांना आज्ञा देण्यात आली आहे. त्यामुळे एका बाप्तिस्मारहित प्रचारकाने बाप्तिस्म्याआधी नियमितपणे सेवाकार्यात सहभाग घेणे गरजेचे आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) पण, बाप्तिस्म्याआधी किती महिने त्याने सेवाकार्यात सहभाग घेतला पाहिजे? प्रत्येक महिना सेवाकार्यात नियमितपणे व आवेशाने सहभाग घेण्याचा त्याने निर्धार केला आहे हे पाहण्यासाठी पुरेसा वेळ देणे योग्य आहे. (स्तो. ७८:३७) पण, त्याने सेवाकार्यात सहभाग घेण्यास सुरुवात केल्यानंतर फार वेळ थांबून राहण्याची गरज नाही; बाप्तिस्मा घेण्यास पात्र होण्यासाठी फक्‍त काही महिने पुरेसे आहेत. त्याने दर महिना क्षेत्र सेवेत किती तास खर्च करावेत? याचे काही नियम नाहीत. वडिलांनी प्रचारकांची वैयक्‍तिक परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतीत समजूतदारपणा दाखवला पाहिजे.—लूक २१:१-४.

बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीशी बोलणाऱ्‍या मंडळीतील वडिलांनी (किंवा ज्या ठिकाणी कमी वडील आहेत तेथील सेवा सेवकांनी) नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे, की प्रत्येक व्यक्‍तीची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे एक व्यक्‍ती बाप्तिस्मा घेण्यास पात्र आहे की नाही हे ठरवताना त्यांनी उत्तम न्यायबुद्धीचा उपयोग केला पाहिजे. बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला यहोवाचा साक्षीदार बनण्याची मनापासून इच्छा असावी अशी अपेक्षा तिच्याकडून केली जाते. तसेच, यहोवाच्या संघटनेशी सहवास राखण्याचा व सेवाकार्यात सहभाग घेण्याचा जो बहुमान आहे त्याबद्दल तिने कदर दाखवावी अशीही अपेक्षा तिच्याकडून केली जाते. पण त्याच वेळी, ती आध्यात्मिक रीत्या अद्याप प्रौढ झालेली नाही किंवा बाप्तिस्मा घेतलेल्या अनुभवी सुवार्तिकांसारखी ती कुशल नाही याची जाणीव वडील बाळगतात. वडिलांना जर असे वाटले की ती बाप्तिस्मा घेण्यास पात्र नाही तर त्याचे कारण काय ते त्यांनी प्रेमळपणे शास्त्रवचनांच्या आधारे तिला सांगितले पाहिजे व आवश्‍यक ती आध्यात्मिक मदत दिली पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा