नमुना सादरीकरणे
जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“जगात शांती असावी असं सर्वांना वाटतं. पण, आजही आपण युद्धं होताना पाहत आहोत. तुमच्या मते, जगात शांती आणणे इतके कठीण का आहे?” घरमालकाचे मत जाणून घ्या. याबद्दल शास्त्रवचनांतून काही माहिती सांगितली तर चालेल का ते त्याला विचारा. घरमालकाने आवड दाखवल्यास, जुलै ते सप्टेंबर टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठ १५ दाखवा आणि सोबत मिळून पहिल्या प्रश्नाखाली असलेल्या माहितीवर व तिथे दिलेल्या निदान एका शास्त्रवचनावर चर्चा करा. त्याला नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची योजना करा.
नोंद: या सादरीकरणाचे प्रात्यक्षिक ६ जुलैच्या प्रचार कार्याच्या सभेत दाखवले जावे.
टेहळणी जुलै - सप्टेंबर
“बऱ्याच लोकांना वाटतं, की देव नैसर्गिक विपत्ती आणतो किंवा त्या विपत्ती रोखण्याचं त्याच्यात सामर्थ्य असूनही तो त्या घडू देतो म्हणून तो निर्दयी आहे. तुम्हाला काय वाटतं? [घरमालकाचे मत जाणून घ्या.] देवाबद्दल एका शास्त्रवचनात काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालकाची हरकत नसल्यास १ योहान ४:८ वाचा.] बऱ्याच जणांना ही गोष्ट पटते तर काहींना पटत नाही. देव निर्दयी का नाही यामागची तर्काला पटतील अशी कारणं या नियतकालिकात देण्यात आली आहेत.”
देवाकडून आनंदाची बातमी!
“आम्ही बऱ्याच जणांशी बोललो, त्यांचं हेच म्हणणं होतं, की देव इतका प्रेमळ असूनही तो इतकी दुःखं का घडू देतो? देवानं पृथ्वी ज्या उद्देशानं बनवली त्यात त्यानं दुःखाचाही समावेश केला असं तुम्हाला वाटतं का?” घरमालकाचे मत जाणून घ्या. बायबलमधून एखादे वचन वाचून दाखवले तर चालेल का ते विचारा. जर त्याने परवानगी दिली तर धडा ५ दाखवा आणि सुरुवातीचे दोन परिच्छेद व तिथे दिलेली तिरप्या वळणातील शास्त्रवचने वाचा आणि त्यांवर चर्चा करा. माहितीपत्रक द्या आणि पुढील ठळक अक्षरांतील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची योजना करा.