मे २७ च्या सप्ताहाचा आराखडा
२७ मे पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १० परि. १०-१९ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: योहान १२-१६ (१० मि.)
क्र. १: योहान १२:२०-३६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: मशीहा प्रकट होतो—बायबलचा संदेश पृ. १९ (५ मि.)
क्र. ३: यहोवाला “शांतीचा देव” असे जे म्हटले आहे ते योग्य का आहे?—रोम. १५:३३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आपण रोवलेल्या सत्याच्या बियांना पाणी घाला. (१ करिंथ. ३:६-९) पुढील प्रश्नांवर आधारित चर्चा. (१) पुनर्भेटी घेताना तुम्हाला कोणती गोष्ट आवडते? (२) कोणत्या अडचणींमुळे काहींना पुनर्भेटी घेणे अवघड जाते? (३) या अडचणींवर मात कशी केली जाऊ शकते? (४) आपल्याला जर पुनर्भेट घेणे अवघड जात असेल तर आपण इतरांची मदत कशी घेऊ शकतो? (५) आवड दाखवणाऱ्या एखाद्या व्यक्तीची, तिच्याबरोबर तुम्ही केलेल्या चर्चेची, तिला दिलेल्या साहित्याची व इतर गोष्टींची नोंद तुम्ही कशी ठेवता? (६) पुनर्भेटी घेण्यासाठी तुम्ही काय तयारी करता? (७) प्रत्येक आठवडी पुनर्भेटी घेण्यासाठी ठराविक वेळ काढणे महत्त्वाचे का आहे?
१५ मि: “व्हिडिओंचा चांगला उपयोग करा.” चर्चा. साक्षीदार बनण्याआधी आपल्या संघटनेचे व्हिडिओ पाहिल्यामुळे श्रोत्यांना कसा फायदा झाला हे त्यांना विचारा.
गीत १० आणि प्रार्थना