वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१३ पृ. ३
  • व्हिडिओंचा चांगला उपयोग करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • व्हिडिओंचा चांगला उपयोग करा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • उद्‌बोधक दृश्‍य साधनांचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००६
  • व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—शिकवण्यासाठी व्हिडिओंचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • साक्ष देणाऱ्‍या व्हिडिओंमुळे पडणारी छाप
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१३
km ५/१३ पृ. ३

व्हिडिओंचा चांगला उपयोग करा

यहोवाला जेव्हा अब्राहाम आणि यिर्मया यांना काही महत्त्वाची माहिती द्यायची होती तेव्हा त्याने त्यांना ती फक्‍त सांगितलीच नाही, तर ती समजावून सांगण्यासाठी त्याने दृश्‍य साधनांचा अर्थात दिसतील अशा गोष्टींचाही उपयोग केला. (उत्प. १५:५; यिर्म. १८:१-६) आपणही आपल्या बायबल विद्यार्थ्यांना बायबलची सत्ये समजून घेण्यासाठी आणि त्यांचे मोल जाणण्यासाठी दृश्‍य साधनांचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ, आपण त्यांना आपल्या संघटनेचे व्हिडिओ दाखवू शकतो. खासकरून, बायबल विद्यार्थ्याला इंग्रजी किंवा दुसरी एखादी भाषा येत असेल तर त्या भाषेत उपलब्ध असलेले व्हिडिओ आपण त्यांना दाखवू शकतो. कोणते व्हिडिओ कधी दाखवायचे हे पुढे सुचवण्यात आले आहे. पण खाली सुचवण्यात आलेल्या पद्धतीनुसारच त्यांचा उपयोग करावा असा काही नियम नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ही वेगळी असते.

बायबल काय शिकवते पुस्तक

◻ अध्याय १: परिच्छेद १७ वर चर्चा केल्यानंतर, द वन्डर्स ऑफ क्रिएशन रिवील गॉड्‌स ग्लोरी हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय २: हा अध्याय संपल्यानंतर, द बायबल—मॅन्काइंड्‌स ओल्डेस्ट मॉडर्न बुक हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय ९: परिच्छेद १४ वर चर्चा केल्यानंतर, जेहोवाज विटनेसेस—ऑर्गनाइझ्ड टू शेअर द गुड न्यूज हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय १४: हा अध्याय संपल्यानंतर, द बायबल —इट्‌स पावर इन युवर लाइफ हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय १५: परिच्छेद १० वर चर्चा केल्यानंतर, अवर होल असोसिएशन ऑफ ब्रदर्स हा व्हिडिओ पाहा

देवाचे प्रेम पुस्तक

◻ अध्याय ३: परिच्छेद १५ वर चर्चा केल्यानंतर, यंग पिपल आस्क—हाऊ कॅन आय मेक रिअल फ्रेंड्‌स? हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय ४: हा अध्याय संपल्यानंतर, रिस्पेक्ट जेहोवाज अथॉरिटी हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय ७: परिच्छेद १२ वर चर्चा केल्यानंतर, नो ब्लड—मेडिसन मिट्‌स द चॅलेन्ज हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय ९: परिच्छेद ६ वर चर्चा केल्यानंतर, वॉर्निंग एक्झॅम्पल्स फॉर अवर डे हा व्हिडिओ पाहा

◻ अध्याय १७: हा अध्याय संपल्यानंतर, ‘वॉक बाय फेथ, नॉट बाय साइट’ किंवा हिंदी भाषेत उपलब्ध असलेला, आँखों-देखी चीज़ों से नहीं विश्‍वास से चलिए हा व्हिडिओ पाहा

यांच्या व्यतिरिक्‍त आणखीही काही व्हिडिओ आहेत ज्यांचा तुमच्या बायबल विद्यार्थ्याला फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, विरोधाचा सामना करणाऱ्‍यांना, फेथफूल अन्डर ट्रायल्स—जेहोवाज विटनेसेस इन द सोवियट युनियन किंवा जेहोवाज विटनेसेस स्टॅन्ड फर्म अगेंस्ट नात्झी असॉल्ट हे व्हिडिओ पाहून उत्तेजन मिळू शकते. तर युवकांना, परस्यू गोल्स दॅट ऑनर गॉड आणि यंग पिपल आस्क—वॉट विल आय डू विथ माय लाइफ? यांचा फायदा होऊ शकतो. बायबल काय शिकवते आणि देवाचे प्रेम पुस्तकांच्या तुमच्या वैयक्‍तिक प्रतीत याची नोंद करा, जेणेकरून विद्यार्थ्याबरोबर कोणता व्हिडिओ कधी पाहायचा किंवा केव्हा तो त्याला पाहायला द्यायचा याची आठवण तुम्हाला राहील. पुढे नवीन व्हिडिओ प्रकाशित होतील तेव्हा विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करा.—लूक २४:३२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा