एप्रिल ८ च्या सप्ताहाचा आराखडा
८ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १६ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ८ परि. १-१० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लूक १०-१२ (१० मि.)
क्र. १: लूक १२:१-२१ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: शलमोन सुज्ञतेने राज्यकारभार चालवतो—बायबलचा संदेश पृ. १३ (५ मि.)
क्र. ३: आपण यहोवाला आपला पिता का मानतो?—मत्त. ६:९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: तुम्ही उत्तेजन देणारे होऊ शकता. (रोम. १:११, १२) सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. मंडळीतील सामान्य पायनियरांची संख्या सांगा. त्यांना उत्तेजन देण्याचे काही मार्ग सांगा; जसे की त्यांची प्रशंसा करणे, त्यांच्यासोबत क्षेत्र सेवेत जाणे, प्रवासाचा खर्च उचलण्यास त्यांना साहाय्य करणे किंवा त्यांना भोजनाकरता आमंत्रित करणे. पायनियरांना विचारा की त्यांना इतरांकडून कसे उत्तेजन मिळाले. मंडळीत जर सामान्य पायनियर नसतील तर साहाय्यक पायनियरांसाठी ही चर्चा केली जाऊ शकते.
१५ मि: “संदेष्ट्यांचे अनुकरण करा—योना.” प्रश्न व उत्तरे.
गीत १३ आणि प्रार्थना