आपली अधिकृत वेबसाईट —आपल्या व इतरांच्या फायद्यासाठी
येशूने आपल्याला “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून” देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याची आज्ञा दिली आहे. (मत्त. २४:१४) आपल्याला सोपवलेले हे सेवाकार्य “पूर्ण” करता यावे म्हणून watchtower.org, jw-media.org आणि jw.org या तिन्ही वेबसाईट एकत्र करून केवळ एकच वेबसाईट म्हणजे jw.org तयार करण्यात आली आहे.—२ तीम. ४:५.
“सर्व जगात”: आज जगातील लोकसंख्येपैकी एकतृतीयांश लोक इंटरनेटचा वापर करतात. अनेकांसाठी आणि खासकरून तरुणांसाठी ते माहितीचा एक प्रमुख स्रोत बनले आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांसाठी आपल्या साईटवर बायबलच्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आहेत. या साईटद्वारे लोक यहोवाच्या संघटनेविषयी माहिती मिळवू शकतात आणि मोफत गृह बायबल अभ्यासाची विनंती करू शकतात. तसेच, जगाच्या ज्या भागांत लोकांना राज्याचा संदेश ऐकण्याची फारशी संधी मिळत नाही त्या भागांत राहणाऱ्या लोकांनाही आपल्या वेबसाईटमुळे राज्याचा संदेश ऐकायला मिळतो.
“सर्व राष्ट्रांस”: सर्व राष्ट्रांतील लोकांना साक्ष द्यायची असल्यास बायबलचे सत्य निरनिराळ्या भाषांत सादर करणे जरुरीचे आहे. इतर कोणत्याही वेबसाईटपेक्षा jw.org वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांना सुमारे ४०० भाषांमध्ये ही माहिती सहज उपलब्ध होते.
वेबसाईटचा चांगला उपयोग करा: नव्याने तयार केलेली ही वेबसाईट केवळ इतरांना साक्ष देण्यासाठीच नव्हे, तर यहोवाच्या साक्षीदारांच्या उपयोगासाठीही तयार करण्यात आली आहे. तुमच्याकडे जर इंटरनेट कनेक्शन असेल तर आम्ही तुम्हाला jw.org या वेबसाईटशी परिचित होण्याचे प्रोत्साहन देतो. तिचा उपयोग कसा करावा याविषयी काही सूचना पुढे दिल्या आहेत.
[३ पानांवरील रेखाचित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
हे करून पाहा
१ तुमच्या कंप्युटरच्या इंटरनेट ब्राउझरवरील ॲड्रेस फिल्डमध्ये www.jw.org एन्टर करा.
२ साईट ओपन झाल्यावर त्यावरील वेगवेगळे मथळे, मेनू ऑप्शन्स आणि लिंक्सवर क्लिक करून पाहा.
३ तुमच्या मोबाईल फोनवर इंटरनेट कनेक्शन असेल तर jw.org ही वेबसाईट उघडून पाहा. फोनची स्क्रिन छोटी असल्यामुळे पेज लेआउट लहान असेल, पण माहिती तीच असेल.