आपली अधिकृत वेबसाईट —वैयक्तिक व कौटुंबिक अभ्यासासाठी
नवीन अंक ऑनलाईन वाचा: टेहळणी बुरूज आणि अवेक! या नियतकालिकांच्या छापील प्रती मंडळीत येण्याच्या अनेक आठवड्यांआधीच या नियतकालिकांचे नवीन अंक ऑनलाईन वाचा. तसेच, नियतकालिकांचे उपलब्ध असलेले ऑडिओ रेकॉर्डिंग्जही ऐका.—“प्रकाशने/नियतकालिके” पाहा.
फक्त वेबसाईटवर प्रकाशित होणारी सदरे वाचा: “For Young People,” “My Bible Lessons,” “For Family Review.” आणि “Young People Ask,” ही सदरे आता केवळ वेबसाईटवर उपलब्ध असतील. तेव्हा, तुमच्या वैयक्तिक व कौटुंबिक अभ्यासात ही माहिती ऑनलाईन वाचून त्यावर चर्चा करा.—“Bible Teachings/Children” किंवा “Bible Teachings/Teenagers” पाहा.
संघटनेतील नवीन घडामोडी जाणून घ्या: प्रोत्साहनदायक अहवाल व अनुभव वाचा आणि जगभरातील आपल्या कार्याची प्रगती दाखवणारे व्हिडिओ क्लिप्स पाहा. निरनिराळ्या आपत्ती व छळ सोसणाऱ्या बांधवांविषयीचे अहवाल वाचल्यामुळे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करणे आपल्याला शक्य होईल. (याको. ५:१६)—“News” पाहा.
ऑनलाईन लायब्ररीचा उपयोग करून रिसर्च करा: हे फिचर तुमच्या भाषेत उपलब्ध असल्यास कम्पुटरवर किंवा मोबाईलवर दैनिक वचनाचे वाचन करा किंवा आपल्या काही नवीन प्रकाशनांत रिसर्च करा.—“प्रकाशने/ऑनलाईन लायब्ररी” पाहा किंवा तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस फिल्डमध्ये www.wol.jw.org टाईप करा.
[४ पानांवरील रेखाचित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
हे करून पाहा
१ चित्रावर किंवा “डाऊनलोड” लिंकवर क्लिक करा. त्यानंतर PDF डॉक्युमेंट विन्डोमध्ये चित्र डिसप्ले होईल. त्याची प्रिन्टआऊट घ्या आणि त्यावर तुमच्या मुलाला त्याची उत्तरे लिहिण्यास सांगा.
२ व्हिडिओ पाहण्यासाठी “प्ले” यावर क्लिक करा.