“. . . महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना”
आमची राज्य सेवा यात दर महिन्याला नियतकालिक सादर करण्याविषयी एक भाग असतो. या भागाचा उद्देश नियतकालिकातील लेखांची उजळणी करणे हा नाही, तर नियतकालिक कसे सादर करता येईल याच्या विविध कल्पनांची चर्चा करणे हा आहे. त्यामुळे सूचनांप्रमाणे भाग हाताळणारा बांधव नियतकालिकाबद्दल उत्सुकता जागी करण्यासाठी भागाच्या सुरुवातीला छोटीशी प्रस्तावना देतो. त्यानंतर तो एका वेळी एका लेखावर (किंवा लेखमालेवर) श्रोत्यांना विविध कल्पना विचारतो जेणेकरून प्रत्येक जण आपआपल्या मासिकात पाहू शकतात व त्यांना आवडलेल्या मुद्द्यांची नोंद करून घेऊ शकतात. नियतकालिक कसे सादर करायचे याविषयी श्रोत्यांना संपूर्ण सादरीकरण विचारण्याऐवजी त्या लेखाबद्दल घरमालकाची उत्सुकता जागी करण्यासाठी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे भाग हाताळणारा बांधव श्रोत्यांना विचारतो; त्यानंतर कोणती शास्त्रवचने वाचली जाऊ शकतात हे तो श्रोत्यांना विचारतो. नियतकालिक कसे सादर करायचे याविषयी एक प्रात्यक्षिक दाखवून तो बांधव भागाचा समारोप करतो. नियतकालिक कसे सादर करता येईल याचा सभेला येण्याआधीच विचार करण्याचे आपल्या सर्वांना उत्तेजन देण्यात आले आहे. आपण जर आधीच चांगली तयारी केली तर या भागामुळे आपण एकमेकांना क्षेत्र सेवेत कुशल होण्यास मदत करू.—नीति. २७:१७.