तुमच्या क्षेत्र सेवेच्या गटापासून फायदा मिळवा
१. मंडळीच्या पुस्तक अभ्यासामुळे मिळणारे कोणते फायदे आजही क्षेत्र सेवेच्या गटामुळे मिळतात?
१ तुम्हाला कधी मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची आठवण होते का? त्या वेळी गट लहान असायचे आणि सर्व निवांत असायचे. यामुळे सर्वांबरोबर मैत्रीचे नाते निर्माण होऊन आध्यात्मिक साहाय्य मिळायचे. (नीति. १८:२४) पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक प्रत्येकाची परिस्थिती ओळखत असे आणि त्यानुसार ते प्रत्येकाला गरजेनुसार प्रोत्साहन देत असे. (नीति. २७:२३; १ पेत्र ५:२, ३) आजही हे सर्व आपल्याला आपल्या क्षेत्र सेवेच्या गटाद्वारे मिळत आहे.
२. आध्यात्मिक साहाय्य देणाऱ्या आपल्या क्षेत्र सेवेच्या गटात मैत्रीचे नाते निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार कसा घेऊ शकतो?
२ पुढाकार घ्या: पुस्तक अभ्यासाप्रमाणे क्षेत्र सेवेचा गट सहसा लहान असतो. सेवाकार्यात सर्वांबरोबर “एकत्र” काम केल्याने मैत्रीचे नाते निर्माण होण्यास मदत मिळते. (फिलिप्पै. १:२७) गटात असणाऱ्या सर्वांबरोबर तुम्ही सेवाकार्य केले आहे का? याबाबतीत तुम्ही तुमची “अंतःकरणे” “विशाल” करणार का? (२ करिंथ. ६:१३) त्याचबरोबर आपण आपल्या क्षेत्र सेवेच्या गटातील एखाद्या व्यक्तीला आपल्या कौटुंबिक संध्याकाळच्या उपासनेत किंवा जेवणासाठी घरी बोलवू शकतो. काही मंडळ्यांमध्ये, क्षेत्र सेवेचा गट आळीपाळीने जे पाहुणे वक्ता येतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतात. पाहुणे वक्ता जेवणासाठी येणार नसले तरी क्षेत्र सेवेचा गट त्यांच्या नियुक्त आठवडी जेवणासाठी आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येतो.
३. क्षेत्र सेवेच्या गटात वडिलांकडून आपल्याला कोणती मदत मिळू शकते?
३ मंडळीतील सर्व जण आता आठवड्यातून कमी वेळा एकत्रित येत असले तरी, याचा अर्थ मंडळीतील वडिलांनी प्रचारकांकडे दुर्लक्ष करावे असा होत नाही. प्रत्येक गटात एक पर्यवेक्षक निवडला जातो जेणेकरून तो गटातील प्रत्येकाला व्यक्तिगत प्रोत्साहन आणि सेवाकार्यासाठी प्रशिक्षण देऊ शकेल. तुमच्या गट पर्यवेक्षकाने तुमच्याबरोबर कधीही सेवाकार्यात काम केले नसेल तर तुम्ही स्वतः त्यांना विचारू शकता. त्याचबरोबर सेवा पर्यवेक्षक महिन्याच्या प्रत्येक आठवडी वेगवेगळ्या गटाबरोबर सेवाकार्यात सहभागी होतात. लहान मंडळ्यांमध्ये जेथे खूप कमी क्षेत्र सेवेचे गट आहेत तेथे पर्यवेक्षक वर्षातून दोनदा प्रत्येक गटाला भेट देऊ शकतो. गट पर्यवेक्षक तुमच्या गटाबरोबर कार्य करण्याचे ठरवतात तेव्हा सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी तुम्ही तुमच्या दिनक्रमात काही फेरबदल करता का?
४. (क) क्षेत्र सेवेच्या सभांची व्यवस्था कशी केली जाते? (ख) क्षेत्र सेवेच्या सभेसाठी आपण आपले घर खुले ठेवण्याचा विचार का करू शकतो?
४ क्षेत्र सेवेच्या प्रत्येक गटाने शनिवारी-रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी भेटणे फायद्याचे आहे. एकाच वेळी पण सेवाकार्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित येणे प्रचारकांसाठी सोपे जाईल. त्यामुळे ते क्षेत्र सेवेच्या सभेसाठी किंवा क्षेत्रात वेळेवर पोहचू शकतील. प्रचारकांच्या जोड्या लावून त्यांना क्षेत्रात होता होईल तितक्या लवकर पाठवण्याची व्यवस्था करावी. यामुळे गट पर्यवेक्षकाला गटाकडे लक्ष देणे सोपे जाईल. परंतु, काही वेळा दोन किंवा त्यापेक्षा जास्त गट सेवाकार्यासाठी एकत्र येणे योग्य राहील. महिन्याच्या पहिल्या शनिवारी किंवा टेहळणी बुरूज अभ्यासानंतर मंडळीतील सर्व जण सेवाकार्यासाठी एकत्र जमत असतील तर प्रत्येक गटाने एकत्र बसावे जेणेकरून गट पर्यवेक्षक जोड्या लावू शकतात. त्यानंतर क्षेत्र सेवेच्या सभेची समाप्ती प्रार्थनेने केली जाऊ शकते. —“तुम्ही तुमचे घर खुले ठेवू शकता का?” ही चौकट पाहा.
५. मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची व्यवस्था जरी बंद झाली असली तरी आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी आहे?
५ मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची व्यवस्था जरी बंद झाली असली तरी यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवे असलेले मार्गदर्शन तो पुरवतो. (इब्री १३:२०, २१) यहोवाच्या प्रेमळ सान्निध्यात असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. (स्तो. २३:१) क्षेत्र सेवेच्या गटाद्वारे आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतात. आपण जर पुढाकार घेऊन “सढळ हाताने” पेरले तर आपल्याला “त्याच मानाने कापणी” करता येईल.—२ करिंथ. ९:६.
[६ पानांवरील चौकट]
“तुम्ही तुमचे घर खुले ठेवू शकता का?”
काही मंडळ्यांमध्ये जास्त घरे उपलब्ध नसल्यामुळे शनिवारी-रविवारी क्षेत्र सेवेचे गट एकत्र केले जातात. क्षेत्र सेवेची सभा ही मंडळीच्या व्यवस्थेचा एक भाग असल्यामुळे ती आपल्या घरी संचालित होत असेल तर हा खरोखरच आपल्यासाठी एक विशेषाधिकार आहे. तुम्ही तुमचे घर खुले ठेवू शकता का? आपले घर लहान आहे म्हणून आपल्या घरी ही सभा होऊ शकत नाही असा विचार करू नका. मंडळीतील वडील पुस्तक अभ्यासासाठी ज्या गोष्टी लक्षात घेत होते त्याच गोष्टी ते आता क्षेत्र सेवेच्या सभेसाठी लक्षात घेतील. तुम्ही जर तुमचे घर क्षेत्र सेवेच्या सभेसाठी देऊ इच्छिता तर गट पर्यवेक्षकाला तसे सांगा.