ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
२९ ऑक्टोबर २०१२ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.
१. यहेज्केलाला दृष्टान्तात दिसलेली वेदी कशाचे प्रतीक आहे? (यहे. ४३:१३-२१) [१० सप्टें. टेहळणी बुरूज०७ ८/१ पृ. १० परि. ४]
२. यहेज्केलाच्या दृष्टान्तातील नदीचे पाणी कशाचे प्रतीक आहे? (यहे. ४७:१-५) [१७ सप्टें. टेहळणी बुरूज०७ ८/१ पृ. १० परि. ८]
३. “दानीएलाने मनाचा निश्चय केला” होता, या शब्दांवरून आपल्याला दानीएलवर लहानपणापासूनच झालेल्या आध्यात्मिक संस्कारांबद्दल काय समजते? (दानी. १:८) [२४ सप्टें. टेहळणी बुरूज०७ ९/१ पृ. १९ परि. २]
४. नबुखद्नेस्सरच्या स्वप्नातील विशाल वृक्ष कशास चित्रित करतो? (दानी. ४:१०, ११, २०-२२) [१ ऑक्टो. टेहळणी बुरूज०७ ९/१ पृ. १८ परि. ५]
५. दानीएल ९:१७-१९ मधून आपण प्रार्थनेविषयी कोणता धडा शिकतो? [८ ऑक्टो. टेहळणी बुरूज०७ ९/१ पृ. २० परि. ५-६]
६. सा.यु. ३६ पर्यंत अथवा वर्षांच्या ७० व्या सप्ताहाच्या शेवटपर्यंत कोणता करार ‘पुष्कळांकरता [चालू राहिला]’? [८ ऑक्टो. टेहळणी बुरूज०७ ९/१ पृ. २० परि. ४]
७. “पारसाच्या राज्याचा अधिपती . . . मला आडवा आला,” असे जे देवदूत दानीएलाला सांगतो त्यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? (दानी. १०:१३) [१५ ऑक्टो. टेहळणी बुरूज जानेवारी-मार्च१२ पृ. २८ परि. १, २]
८. दानीएल १२:३ मधील भविष्यवाणी आज कशी पूर्ण होत आहे? [१५ ऑक्टो. टेहळणी बुरूज०७ ९/१ पृ. २० परि. ८]
९. होशेय ४:११ नुसार प्रमाणाबाहेर दारू पिण्याचा एक धोका काय आहे? [२२ ऑक्टो. टेहळणी बुरूज०४ १२/१ पृ. २० परि. ४]
१०. होशेय ६:६ मधून आपण कोणता धडा शिकतो? [२२ ऑक्टो. टेहळणी बुरूज०७ ९/१५ पृ. १६ परि. ८; टेहळणी बुरूज०५ ११/१५ पृ. २४ परि. ११-१२]