योग्य वेळी मदत
१ मंडळीविषयी खरी काळजी वाटत असल्यामुळे येशू “योग्य वेळी मदत” देण्यासाठी नेहमीच तयार आहे. (इब्री ४:१६) यापैकीची बहुतेक मदत ही इफिसकरांस पत्र ४:८, ११, १२ वचनांत अभिवचन दिलेल्या “मनुष्यांतील दाने” यांच्याकरवी दिली जात आहे. यापैकीचे एक दान म्हणजे प्रत्येक मंडळीत असणारे सेवा देखरेखे होय.
२ हे सेवा देखरेखे आम्हाला कोणकोणत्या मार्गी मदत देऊ शकतात? ते या विविध प्रकारानेः (१) ते आम्हा सर्वांना प्रचार करण्याच्या तसेच शिष्य बनविण्याच्या कामाच्या महत्त्वपूर्णतेविषयी सतत जागृत ठेवण्याचे काम करतात. (२) मंडळीच्या पुस्तक अभ्यास गटाच्या माध्यमाने क्षेत्रकार्याच्या बाबतीत चांगले संघटन तसेच नेतृत्व दिले जात आहे याची काळजी त्यांना असते. (३) उपाध्याय या नात्याने आमचा प्रभावीपणा सुधारण्यासाठी आवश्यक असणारी वैयक्तीक मदत आम्हा प्रत्येकास मिळत आहे हे पाहण्यात ते आस्था राखतात.
सेवा देखरेख्यांच्या भेटी
३ मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या नियमित साहाय्याशिवाय आम्हाला वैयक्तीक आधाराने मदत मिळावी यासाठी खास तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. सेवा देखरेखे हे बहुधा मंडळीचा एखादा पुस्तक अभ्यास चालवितात पण महिन्यातून एकदा ते आपला गट सोडून दुसऱ्या एका पुस्तक अभ्यासाला भेट देऊन त्या आठवडाभरात त्या गटाशी मिळून कार्य करतात. अशावेळी त्यांचा पुस्तक अभ्यास त्यांचा साहाय्यक चालवितो. ज्या पुस्तक अभ्यास गटाला ते भेट देणार आहेत त्याला ते आगाऊच कळवितात म्हणजे आठवडाभराच्या कार्याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी त्या गटाला आवश्यक अशा योजना आखता येतात.
४ या खास सप्ताहात पुस्तक अभ्यास नेहमीप्रमाणे ४५ मिनिटे चालविला जातो. यानंतर १५ मिनिटे सेवा देखरेखे त्या गटातील सुवार्तिक कार्याला अधिक चालना येण्यासाठी उत्तेजनपर भाषण देतात. या कारणासाठी यावेळी त्या गटातील सर्व प्रचारकांनी तसेच आस्थेवाईक लोकांनी उपस्थित राहणे अगत्याचे आहे.
५ ज्या गटास ही भेट दिली जात आहे तेथील सर्व प्रचारकांनी या खास भेटी दरम्यान व विशेषतः सप्ताहाच्या शेवटी आयोजित असणाऱ्या सेवेत पूर्ण सहभाग घेण्याची व्यवस्था करावी. जेथे शक्य आहे तेथे सायंकाळच्या कार्याचीही योजना केली जावी. क्षेत्रकार्यात होता होईल तितक्या प्रचारकांसोबत कार्य करावे हे सेवा देखरेख्यांचे एक ध्येय असते. ते आम्हासोबत कदाचित आमच्या पुनर्भेटीस व पवित्र शास्त्राभ्यासास देखील येतील. ज्यांना उपाध्यपणात साहाय्याची तसेच उत्तेजनाची गरज आहे अशा सर्वांनी त्यांना मुक्तपणे विनंती करावी. याचप्रमाणे त्या आठवडाभरात ते गटाच्या साक्षीकार्यात ज्या क्षेत्रकार्याच्या सभा चालवितील त्यांना उपस्थित राहून आपल्याला लाभ मिळवता येईल.
६ गटाचे कार्य कसे चालले आहे त्याविषयी पुस्तक अभ्यास चालकासोबत बोलण्यासाठी ते वेळ काढतात. गटामध्ये क्षेत्रकार्याच्या ज्या योजना आहेत त्यांची उजळणी होते व त्या सर्वांना व्यावहारिक फायदा मिळावा अशा व्यावहारिक मार्गी संघटीत केल्या आहेत याची पाहणी केली जाते. या गटातील काहींनी उपाध्यपणात आपला सहभाग वाढवावा यासाठी मदत किंवा प्रोत्साहन देण्याची गरज दिसत असेल तर ते यांच्याशी वैयक्तीकपणे बोलून यात सुधारणा करण्याविषयी काही दयाळू प्रस्ताव मांडतील. सेवा देखरेख्याने गटाच्या अभ्यासचालकासोबत मिळून अनियमित प्रचारकांना भेटी देण्याच्या योजना आखाव्यात. याखेरीज, या गटाच्या पवित्र शास्त्र अभ्यासाच्या अहवालाची फाईल ते गटाच्या अभ्यासचालकासोबत मिळून चाळतील. कदाचित दोघांना काही प्रचारकांच्या पवित्र शास्त्र अभ्यासाला जाता येईल व आध्यात्मिक प्रोत्साहन देता येईल.
७ मंडळीत बरेचसे पुस्तक अभ्यास चालविले जात असल्यामुळे सेवा देखरेख्यांच्या भेटी सहसा कमी प्रमाणात राहतील. या कारणास्तव ते भेट देतील तेव्हा त्याचा सर्वतोपरि फायदा घेण्यासाठी सर्वांनीच खास प्रयत्न केले पाहिजे. या भेटी दरम्यान तुमचे उपाध्यपण सुधारण्यासाठी ज्या सूचना प्रस्तुत केल्या जातील त्याची नोंद करा व पुढची भेट होण्याआधी त्यांचा अवलंब करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. हे खरे की जेव्हा गरज पडते तेव्हा साहाय्य देण्यासाठी ते आम्हाला मंडळीत भेटतच असतात. जेथे मंडळीत पुस्तक अभ्यासाचे गट कमी आहेत तेथे सेवा देखरेखे प्रत्येकाला निदान सहा महिन्यातून एकदा भेट देण्याची योजना करतील.
८ सेवा देखरेख्यांना स्वेच्छेने दिलेले सहकार्य तसेच ते आमच्या पुस्तक अभ्यास गटाला भेट देतात तेव्हा पूर्णहृदयाने दिलेले पाठबळ आम्हाला शिष्य बनविण्याच्या कामातील आमचा प्रभावीपणा वाढविण्यास व आमच्या उपाध्यपणात अधिक आनंद मिळविण्यास साहाय्यक ठरु शकेल.