सप्टेंबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा
२४ सप्टेंबरने सुरू होणारा सप्ताह
गीत २० आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १२९, १३० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दानीएल १-३ (१० मि.)
क्र. १: दानीएल २:१७-३० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: वैवाहिक बंधनाला पुन्हा बळकटी आणणे—कुटुंब पृ. १६५ परि. १०-पृ. १६७ परि. १३ (५ मि.)
क्र. ३: आपण आत्म्याला खिन्न करण्याचे कसे टाळू शकतो?—इफिस. ४:३० (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: दैनिक वचनाची दररोज चर्चा करा! आमची राज्य सेवा जानेवारी २००० पृष्ठ ३ वर आधारित चर्चा. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा या पुस्तिकेचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या. दररोज शास्त्रवचनांवर आणि त्यासोबत दिलेल्या माहितीवर चर्चा करण्यासाठी प्रचारक कशा प्रकारे विशेष प्रयत्न करतात ते त्यांना विचारा.
२० मि: “तरुणांनो—अर्थपूर्ण ध्येये गाठण्याचा प्रयत्न करा.” प्रश्न व उत्तरे. तरुणांना आध्यात्मिक ध्येये ठेवण्याचे आणि ती ध्येये मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन द्या. एक किंवा दोन नियमित पायनियरांची किंवा पूर्ण वेळच्या सेवेला करियर बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांची मुलाखत घ्या. या जगात करियर बनवण्याऐवजी त्यांनी आध्यात्मिक ध्येये मिळवण्याचे का निवडले हे त्यांना विचारा.
गीत ११ आणि प्रार्थना