जुलै ३० च्या सप्ताहाचा आराखडा
३० जुलैने सुरू होणारा सप्ताह
गीत ३९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११६ “जाता जाता अधिक ताकीद” या पोटमथळ्यापर्यंत. (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यहेज्केल २१-२३ (१० मि.)
क्र. १: यहेज्केल २३:३५-४५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देवाचे प्रेम किती व्यापक आहे?—योहा. ३:१६; रोम. ८: ३८, ३९ (५ मि.)
क्र. ३: पती-पत्नीमधील मतभेदांची चर्चा करणे—कुटुंब पृ. १५५ परि. ७-पृ. १५६ परि. ९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. पान ८ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शनिवारी नियतकालिकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
२५ मि: “आपली प्रांतीय अधिवेशने—सत्याची जोरदार साक्ष देतात.” प्रश्नोत्तरे. “२०१२ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना” यातील लागू होणाऱ्या मुद्द्यांची चर्चा करा. परिच्छेद ९ वर चर्चा करताना, अधिवेशनाच्या आमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यासंबंधी मंडळीने काय व्यवस्था केली आहे ते सेवा पर्यवेक्षकांना विचारा.
गीत २० आणि प्रार्थना