वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१२ पृ. १
  • सेवाकार्य करताना सावधगिरी बाळगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवाकार्य करताना सावधगिरी बाळगा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९४
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्‍हेने सेवा करा
    आमची राज्य सेवा—१९९८
  • सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ५/१२ पृ. १

सेवाकार्य करताना सावधगिरी बाळगा

१. सेवाकार्यात सावधगिरी बाळगणे का आवश्‍यक आहे?

१ देवाचे सेवक “लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे,” “ह्‍या कुटिल व विपरीत पिढीत” सुवार्ता सांगत आहेत. (मत्त. १०:१६; फिलिप्पै. २:१५) दंगली, सामूहिक हिंसा व क्रूरपणे होणारी अपहरणे यांसारख्या गोष्टी सर्रासपणे घडताना दिसतात आणि या सर्व गोष्टी लोक “दुष्टपणात अधिक” सरसावत असल्याचा पुरावा आहे. (२ तीम. ३:१३) सेवाकार्य करताना सावधगिरी बाळगण्यासाठी बायबलची कोणती तत्त्वे आपल्याला मदत करू शकतात?—मत्त. १०:१६.

२. कोणत्या प्रसंगी एखादे क्षेत्र सोडून दुसऱ्‍या क्षेत्रात जाणे योग्य राहील?

२ सुज्ञपणे वागा: नीतिसूत्रे २२:३ या वचनात संकटापासून लपण्यात सुज्ञपणा आहे यावर जोर देण्यात आला आहे. तेव्हा नेहमी चौकस राहा! शांत व सुरक्षित समजल्या जाणाऱ्‍या परिसराचे रूप अचानक बदलू शकते. पोलिसांचा बंदोबस्त किंवा लोक रस्त्यावर उतरल्याचे तुम्ही पाहाल. कधीकधी एखादा चांगला घरमालक आपल्याला धोक्याची सूचना देईल. अशा वेळी, उत्सुकतेपोटी त्या क्षेत्रात घुटमळत राहण्यापेक्षा तिथून पटकन निघून दुसरीकडे कार्य करणे सुज्ञतेचे ठरेल.—योहा. ८:५९; १ थेस्सलनी. ४:११, १२.

३. उपदेशक ४:९ या वचनातील तत्त्व आपल्याला सेवाकार्यात कसे मदत करू शकते?

३ दोघे-दोघे काम करा: उपदेशक ४:९ या वचनात, “एकट्यापेक्षा दोघे बरे” असे म्हटले आहे. पूर्वी तुम्हाला क्षेत्र सेवेत एकटे काम करणे सुरक्षित वाटत असेल, पण आता तसे करणे सुरक्षित आहे का? काही ठिकाणी एकटे काम करणे सुरक्षित आहे. पण इतर ठिकाणी एखाद्या बहिणीने किंवा तरुण व्यक्‍तीने खासकरून संध्याकाळी घरोघरचे साक्षकार्य एकटे करणे योग्य राहणार नाही. अनुभवावरून दिसून आले आहे, की सेवाकार्यात आपल्याबरोबर काम करणारा प्रचारक चौकस असेल तर त्याचा खूप फायदा होतो. (उप. ४:१०, १२) तुमच्या सेवा गटातील इतर सदस्य त्या क्षेत्रात कार्य करत असतील तर त्यांच्यावरही लक्ष ठेवा. तुम्ही क्षेत्रातून निघून जाणार असाल तर जाण्याआधी इतरांना सांगायला विसरू नका.

४. मंडळीतील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपण काय करू शकतो?

४ आपल्या “जिवांची राखण” करणारे या नात्याने मंडळीतील वडिलांवर स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला व्यावहारिक मार्गदर्शन पुरवण्याची जबाबदारी आहे. (इब्री १३:१७) आपण नम्रता दाखवली आणि वडिलांना पूर्णपणे सहकार्य केले तर आपल्याला नक्कीच यहोवाचे आशीर्वाद मिळतील. (मीखा ६:८; १ करिंथ. १०:१२) देवाचे सेवक या नात्याने आपण सर्व जण आपल्या क्षेत्रात प्रभावकारी साक्ष देत राहू, पण असे करताना नेहमी सावधगिरी बाळगू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा