मे २८ च्या सप्ताहाचा आराखडा
२८ मेने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०३, १०४ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया ४९-५० (१० मि.)
क्र. १: यिर्मया ४९:२८-३९ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: यहोवाचे नाव कोणत्या अर्थाने एक “बळकट दुर्ग” आहे?—नीति. १८:१० (५ मि.)
क्र. ३: कुटुंबातील एखादा मद्यपी असल्यास कसे तोंड द्यावे?— कुटुंब पृ. १४३ परि. ५–पृ. १४४ परि. ८ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. जून महिन्याची साहित्य सादरता सांगा आणि ते सादर करण्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
२५ मि: “तुमची मुले तयार आहेत का?” प्रश्न व उत्तरे. मुलांना शाळेत कोणत्या विशिष्ट समस्यांचा सामना करावा लागतो त्याविषयी पालकांना आणि मुलांना विचारा. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर, एका पिता-पुत्राच्या सरावसत्राचे प्रात्यक्षिक दाखवा. पिता शिक्षक आहेत आणि मुलगा, आपण शाळेतील अमुक एक गोष्ट का करू शकत नाही किंवा त्यात का भाग घेऊ शकत नाही याचे स्पष्टीकरण देतो.
गीत ४५ आणि प्रार्थना