वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१२ पृ. ३
  • तुमची मुले तयार आहेत का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची मुले तयार आहेत का?
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • आव्हानांना तोंड देण्यास तुमच्या मुलांना साहाय्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • शाळेत जाण्यास तुम्ही तयार आहात का?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • तुमची मुले शाळेत दृढनिश्‍चयी असतात का?
    आमची राज्य सेवा—१९९०
  • “मुलं यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ५/१२ पृ. ३

तुमची मुले तयार आहेत का?

१. शाळेला जाणाऱ्‍या मुलांनी कशासाठी तयार राहिले पाहिजे?

१ शाळेचे नवीन वर्ष सुरू होण्याची वेळ आली आहे. तुमच्या मुलांना शाळेत नवनवीन समस्यांचा आणि दबावांचा प्रतिकार करावा लागेल यात काही शंका नाही. पण त्यासोबतच, त्यांना “सत्याविषयी साक्ष” देण्याच्या नवनवीन संधीही मिळतील. (योहा. १८:३७) यासाठी ते तयार आहेत का?

२. तयार राहण्यासाठी तुमच्या मुलांना काय माहीत असणे गरजेचे आहे?

२ कोणत्या गोष्टी राष्ट्रीय समारंभांत व सणासुधीत मोडतात आणि आपण त्यांत भाग का घेऊ शकत नाही हे तुमच्या मुलांना माहीत आहे का? उच्च शिक्षण घेण्याच्या, डेटिंग व मद्यपान करण्याच्या आणि ड्रग्ज घेण्याच्या दबावांना सामोरे जाण्यास ते तयार आहेत का? अमुक एक गोष्ट करणे आमच्या धर्माच्या विरोधात आहे केवळ असे उत्तर तुमची मुले देतात का, की आपल्या धार्मिक विश्‍वासांचे ते स्पष्टीकरण देतात?—१ पेत्र ३:१५.

३. आपल्या मुलांना तयार करण्यासाठी पालक कौटुंबिक उपासनेचा कसा उपयोग करू शकतात?

३ आपल्या कौटुंबिक उपासनेचा उपयोग करा: अर्थात, संबंध शालेय वर्षादरम्यान तुमच्या मुलांसमोर येणाऱ्‍या समस्यांची तुम्ही नक्कीच चर्चा करत असाल. पण, शाळा सुरू होण्याआधी शाळेत येणाऱ्‍या समस्यांवर चर्चा करण्यासाठी खास प्रयत्न केल्याने तुमच्या मुलांचा आत्मविश्‍वास वाढू शकतो. मग, असे करण्यासाठी कौटुंबिक उपासनेचा उपयोग करण्यात काय हरकत आहे? तुम्ही तुमच्या मुलांना विचारू शकता, की परत शाळेत जाण्याच्या विचाराने त्यांना कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त धास्ती लागते? तुम्ही पूर्वी तुमच्या मुलांबरोबर बऱ्‍याच विषयांची चर्चा केली असेल; पण, आता मुले मोठी झाली असल्यामुळे व त्यांची समजशक्‍तीही वाढल्यामुळे तुम्ही पुन्हा त्या विषयांची त्यांच्यासोबत चर्चा करून ती माहिती त्यांच्या ध्यानात आणू शकता. (स्तोत्र ११९:९५) तुम्ही त्यांच्याबरोबर काही सरावसत्र घेऊ शकता ज्यात तुम्ही शिक्षकाची, सल्लागाराची किंवा शाळेतील विद्यार्थ्याची भूमिका करू शकता. बायबलचा उपयोग करून उत्तर कसे द्यायचे, तसेच रिझनिंग, यंग पीपल आस्क यांसारख्या साहित्यांचा उपयोग कसा करायचे हे तुमच्या मुलांना शिकवा. एका बहिणीने, दर वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर नवीन शिक्षकांना भेटून आपण यहोवाचे साक्षीदार असल्याचे कसे सांगायचे हे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी सरावसत्रांचा उपयोग केला.—टेहळणी बुरूज, १५ डिसेंबर २०१०, पृष्ठे ३-५ पाहा.

४. सुज्ञ पालक काय करतात?

४ या शेवटल्या काळात ख्रिस्ती मुलांना समस्यांचा सामना करणे अधिकाधिक “कठीण” होत चालले आहे. (२ तीम. ३:१) पण, जे पालक सुज्ञ आहेत ते आपल्या मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल याचा अंदाज बांधतात आणि त्यांवर यशस्वी रीत्या मात करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करतात. (नीति. २२:३) तेव्हा, नवीन शालेय वर्ष सुरू होण्याआधी आपल्या मुलांच्या मनाची तयारी करण्यास होईल तितका प्रयत्न करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा