नमुना सादरीकरणे
एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“सर्वांनाच आनंदी व अर्थपूर्ण जीवन जगावेसे वाटते. देवाच्या खऱ्या उपासनेमुळे माणूस आनंदी होऊ शकतो, ही गोष्ट तुम्हाला पटते का? [उत्तरासाठी थांबा. एखादे वचन वाचून दाखवले तर चालेल का, असे घरमालकाला आधी विचारा. त्याने होकार दिल्यावर मत्तय ५:३ वाचा.] आपण करत असलेल्या उपासनेबद्दल देवाला काय वाटते, ते या नियतकालिकात समजावून सांगितले आहे.” घरमालकाला अधिक माहिती घ्यायची इच्छा असेल तर एप्रिल-जून हे टेहळणी बुरूज त्याला द्या आणि पृष्ठ १६ वरील पहिल्या मथळ्याखालच्या माहितीची व त्यात उल्लेखलेल्या निदान एका वचनाची तरी चर्चा करा. त्याला हे नियतकालिक वाचायला आवडेल का असे विचारा आणि पुढील प्रश्नाची चर्चा करण्यासाठी वेळ ठरवा.
टेहळणी एप्रिल - जून
“सेक्सबद्दल लोकांची मते सतत बदलत आहेत. परंतु बायबलमध्ये सांगितलेले नैतिक स्तर कधीच बदलत नाहीत. काहींना हे नैतिक स्तर जुनाट व बंधनकारक वाटतात. पण ते आपल्याच फायद्यासाठी कसे आहेत व ते कोणी ठरवलेत हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [घरमालक ऐकण्यास इच्छुक असेल तर, २ तीमथ्य ३:१६ वाचा. पृष्ठ २० वरील लेख दाखवा.] सेक्सबद्दलच्या दहा प्रश्नांची बायबलमध्ये दिलेली उत्तरे या लेखात दिली आहेत. बायबलमधील स्तरांनुसार वागल्याने आपला फायदा कसा होतो, हेही या लेखात सांगितले आहे.”