एप्रिल २ च्या सप्ताहाचा आराखडा
२ एप्रिलने सुरू होणारा सप्ताह
गीत ३९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ८८ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया १७-२१ (१० मि.)
क्र. १: यिर्मया २१:१-१० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सैतान ज्या प्रकारे शासन करतो त्यावरून काय सिद्ध झाले आहे? (५ मि.)
क्र. ३: पतीचा वेगळा विश्वास असल्यास शांती कशी राखावी?—कुटुंब पृ. १२९ परि. ३-पृ. १३२ परि. ९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. या पृष्ठावरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: एप्रिल महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रात लोकांना आवडतील असे काही लेख एक-दोन मिनिटांत दाखवा. त्यानंतर, टेहळणी बुरूज नियतकालिकातील सुरुवातीची लेख मालिका दाखवून घरमालकाची आस्था जागृत करण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याबद्दल श्रोत्यांना विचारा आणि मग कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ३० आणि प्रार्थना