घोषणा
◼ साहित्य सादरीकरण मार्च: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकांकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज. जेथे आवड दाखवली जाते तेथे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका द्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. स्मारकविधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमितरीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा बायबल काय शिकवते या पुस्तकाचा उपयोग करून त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जून: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकांकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात.
◼ या वर्षीचा स्मारकविधी गुरुवार ५ एप्रिल, २०१२ रोजी साजरा करण्यात येईल. तुमच्या मंडळीची सभा गुरुवारच्या दिवशी होत असेल तर ती त्याच आठवड्यात, राज्य सभागृहात सभा होत नसलेल्या इतर दिवशी ठेवावी. हे शक्य नसेल तर तुमच्या मंडळीला खासकरून लागू होणारे सेवा सभेतील भाग पुढील सेवा सभेत घेतले जाऊ शकतात.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
देवाचे ऐका व देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा —उडिया, मणिपुरी
देवाचे ऐका —उडिया, मणिपुरी
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
“उत्तम देश पाहा” —कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी
सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता —कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी