वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/११ पृ. ३
  • उत्तम शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तम शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • प्रेम—एक मौल्यवान गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • कायम टिकून राहणारे प्रेम विकसित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km ११/११ पृ. ३

उत्तम शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण

१. कोणत्या महत्त्वपूर्ण गुणामुळे एक व्यक्‍ती उत्तम शिक्षक बनते?

१ एक व्यक्‍ती बायबलचा उत्तम शिक्षक कशी बनते? जगिक शिक्षणामुळे? सत्यात अनेक वर्षांपासूनच्या अनुभवामुळे? की आपल्यातील कौशल्यांमुळे? खरे तर, एक व्यक्‍ती बायबलचा उत्तम शिक्षक एका गुणामुळे बनते. या गुणामुळे नियमशास्त्राची पूर्णताही होते, येशूच्या शिष्यांना ओळखले जाते व हाच गुण यहोवाच्या मुख्य गुणांपैकी एक आहे. (योहा. १३:३५; गलती. ५:१४; १ योहा. ४:८) हा गुण आहे प्रेम. उत्तम शिक्षक इतरांवर प्रेम करतात.

२. आपण लोकांवर प्रेम का केले पाहिजे?

२ लोकांवर प्रेम करा: थोर शिक्षक येशू याने लोकांवर प्रेम केले आणि यामुळे लोकही त्याचे ऐकण्यासाठी प्रवृत्त झाले. (लूक ५:१२, १३; योहा. १३:१; १५:१३) आपल्याला लोकांची काळजी असेल तर त्यांना साक्ष देण्यासाठी आपण प्रत्येक संधीचा उपयोग करू. छळ आणि लोकांची उदासीन मनोवृत्ती यांसारखी अडखळणे आल्यावर आपण खचणार नाही. आपण प्रचार करत असलेल्या प्रत्येकाविषयी आवड दाखवू आणि त्यांना कोणत्या गोष्टीची काळजी वाटते त्यानुसार बदल करून संदेश सांगू. आपल्या प्रत्येक बायबल विद्यार्थ्याबरोबर वेळ घालवण्यासाठीच नव्हे तर प्रत्येक बायबल अभ्यासाची पूर्व तयारी करण्यासाठीदेखील आपण वेळ काढू.

३. सेवेत बायबल सत्यावरील प्रेम आपली कशी मदत करू शकते?

३ बायबल सत्यावर प्रेम करा: येशूनेही बायबल सत्यावर प्रेम केले आणि त्याला खजिन्याप्रमाणे समजले. (मत्त. १३:५२) आपण सत्यावर प्रेम केले तर आपणही उत्साहाने त्याविषयी बोलू. याची ऐकणाऱ्‍यांवर चांगली छाप पडू शकते. हे प्रेम आपल्याला, स्वतःच्या कमतरतांवर विचार करण्यापेक्षा आपण देत असलेल्या मोलवान माहितीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. आणि असे केल्यास आपण सेवेत घाबरणार नाही.

४. आपण प्रेम कसे वाढवू शकतो?

४ प्रेमात वाढ करा: आपण लोकांबद्दलचे प्रेम कसे वाढवू शकतो? यहोवा आणि येशूने दाखवलेल्या प्रेमावर मनन करण्याद्वारे आणि क्षेत्रातील लोकांची दयनीय आध्यात्मिक अवस्था पाहण्याद्वारे आपण लोकांबद्दलचे प्रेम वाढवू शकतो. (मार्क ६:३४; १ योहा. ४:१०, ११) नियमित वैयक्‍तिक अभ्यास आणि मनन करण्याद्वारे आपण बायबल सत्यावरचे आपले प्रेम वाढवू शकतो. प्रेम हा आत्म्याच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२) म्हणून पवित्र आत्मा मिळण्यासाठी व प्रेमात वाढ करण्यासाठी आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. (लूक ११:१३; १ योहा. ५:१४) आपले शिक्षण, सत्यात अनेक वर्षांपासूनचा अनुभव किंवा खास कौशल्ये यांच्यामुळे नव्हे तर प्रेम दाखवून आपण एक प्रभावकारी शिक्षक होऊ शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा