क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
एप्रिल २०११
२०११ सेवा वर्षाच्या दरम्यान आपल्या कार्यावर यहोवाचा खूप आशीर्वाद होता हे स्पष्ट दिसून आले. स्मारकदिनाच्या दिवशी ९४,९५४ लोक उपस्थित होते, म्हणजे मागील वर्षाच्या उपस्थितीपेक्षा ही ८.५ टक्के वाढ होती. एप्रिल महिन्याच्या खास सेवाकार्यात १७,२२२ प्रचारकांनी सहायक पायनियरींग करून या कार्याला भरभरून सहकार्य केले. या महिन्यादरम्यान आपण ३४,९१२ प्रचारक, ३,२०६ सामान्य पायनियर, आणि ४१,५५४ बायबल अभ्यास असा नवीन उच्चांक गाठला आहे.