सप्टेंबर २६ च्या सप्ताहाचा आराखडा
२६ सप्टेंबर ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४० (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे १४२-१५० (१० मि.)
क्र. १: स्तोत्र १४४:१–१४५:४ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: मूलभूत गरजा पूर्ण केल्याने बंडाळीला प्रतिबंध होऊ शकतो—कुटुंब पृष्ठे ८२-८४, परि. १४-१८ (५ मि.)
क्र. ३: ‘तोंड पाहून’ वागण्याचे आपण का टाळले पाहिजे?—याको. २:१-४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. “बायबलचा संदेश या माहितीपत्रकाचा उपयोग करण्याचा एक मार्ग” यावर चर्चा. पृष्ठ ४ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून ऑक्टोबर १ च्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवा. सर्वांना सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या.
१० मि: प्रश्न पेटी. चर्चा. आमची राज्य सेवा, मार्च २००५ च्या पृष्ठ ८ वरील मुद्द्यांचा समावेश करा.
१५ मि: ऑक्टोबर महिन्यात नियतकालिक सादर करण्याकरता तयारी करणे. चर्चा. एक-दोन मिनिटांमध्ये, तुमच्या क्षेत्रात लोकांना आवडतील असे लेख दाखवा. त्यानंतर, दोन-तीन लेख निवडा व प्रत्येक लेख कसा सादर करायचा ते सांगा. यासाठी ते घरमालकाला त्याची आवड जागृत करणारा कोणता प्रश्न विचारू शकतात व लेखातील कोणते शास्त्रवचन दाखवू शकतात हे श्रोत्यांना विचारा. हे नियतकालिक आपण घरमालकाला कसे देऊ शकतो त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ४१ व प्रार्थना