‘देवाचे नाव पवित्र मानले जावो’
१. आपल्या २०१२ सेवा वर्षाच्या विभागीय संमेलन दिनाचा मुख्य विषय काय आहे आणि तो कशावर आधारित आहे?
१ विश्वाचा सार्वभौम प्रभू यहोवा याचे नाव धारण करण्याचा किती मोठा सन्मान आपल्याला मिळाला आहे! स्वतः यहोवाने आपल्याला हे नाव धारण करू दिले आहे आणि १९३१ पासून खासकरून यहोवाचे साक्षीदार या अनोख्या नावाने आपल्याला ओळखले जाते. (यश. ४३:१०) देवाच्या एकुलत्या एका पुत्राने, येशूने आपल्या पित्याचे नाव उंचावले आणि आदर्श प्रार्थनेत देवाचे नाव पवित्र करण्याला त्याने प्रथम स्थान दिले. (मत्त. ६:९) येशूचे हे शब्द, २०१२ सेवा वर्षाच्या आपल्या विभागीय संमेलनाचा मुख्य विषय ठरणार आहेत. तो मुख्य विषय आहे, “देवाचे नाव पवित्र मानले जावो.”
२. कोणत्या माहितीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत?
२ आपण काय ऐकणार आहोत: “पूर्ण वेळचे सेवक या नात्याने देवाचे नाव प्रकट करा” हे भाषण शनिवारी दिले जाईल. पूर्ण वेळच्या सेवेमुळे जीवन समाधानकारक कसे बनते यावर चर्चा करण्यात येईल. त्याचबरोबर, “यहोवाच्या नावावर कलंक आणण्यापासून सावध राहा” हा परिसंवाद असेल. या परिसंवादात अशा चार मुख्य पाशांत अडकण्यापासून आपण सावध कसे राहू शकतो ते सांगितले जाईल. लोक जास्त आवड दाखवत नाहीत तेव्हाही आपण प्रचार कार्यात आवेश कसा टिकवून ठेवू शकतो? आणि कोणती गोष्ट आपल्याला परिणामकारक क्षेत्र सेवा चालू ठेवण्यास मदत करू शकते? या प्रश्नांची उत्तरे, “देवाचे नाव का पवित्र मानले पाहिजे” या भाषणात दिली जातील. रविवारी आपण चार भागांच्या परिसंवादाचा आनंद घेऊ शकतो. जसे की, आपले विचार, आपली बोलीभाषा, आपले निर्णय आणि आचरण याद्वारे आपण देवाचे नाव कसे पवित्र करू शकतो. “हर्मगिदोनाच्या वेळी यहोवा त्याचे महान नाव पवित्र करील” असा विषय असलेले जाहीर भाषण नवीन लोकांना खासकरून खूप आवडेल.
३. आपल्याला कोणता सन्मान मिळाला आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला कशी मदत करेल?
३ लवकरच, यहोवा त्याचे नाव पवित्र करण्यासाठी कार्य करणार आहे. (यहे. ३६:२३) तोपर्यंत, यहोवाचे पवित्र नाव उंचावण्यात गोवलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा सन्मान आपल्याला मिळालेला आहे. हे विभागीय संमेलन आपल्यापैकी प्रत्येकाला, देवाचे नाव धारण करण्याची जबाबदारी पूर्ण करण्यास लागणारी मदत देईल, असा आपल्याला विश्वास आहे.