ऑगस्ट १ च्या सप्ताहाचा आराखडा
१ ऑगस्ट ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. २८, २९ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे ८७-९१ (१० मि.)
क्र. १: स्तोत्र ८९:२६-५२ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: यहोवाचे विश्वासू सेवक आनंदी का असतात? (५ मि.)
क्र. ३: कौटुंबिक अभ्यास—कुटुंब पृष्ठे ६९, ७० परि. १२-१४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. या पानावर असणाऱ्या नमुना सादरीकरणाचा उपयोग करून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. सर्वांना बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
१५ मि: शिकवण्यास मदत करणारी उदाहरणे. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकाच्या पृष्ठ २४०-२४३ वर आधारित चर्चा. श्रोत्यांना विचारा की घरमालकाबरोबर किंवा बायबल विद्यार्थ्याबरोबर तर्क करताना त्यांनी कोणती उदाहरणे वापरली होती.
१० मि: स्थानीय गरजा.
गीत ५४ व प्रार्थना