जुन्या प्रकाशनांचा साठा करून ठेवण्यापेक्षा त्यांचा उपयोग करा
अनेक मंडळ्यांमध्ये जुन्या प्रकाशनांचा साठा साचला आहे. तुमच्या वैयक्तिक ईश्वरशासित ग्रंथालयात ठेवण्यासाठी यातील काही प्रती तुम्ही घेऊ शकता का? छापील स्वरूपात तुमच्याजवळ असलेल्या जुन्या प्रकाशनांचा, तुम्हाला त्याचप्रमाणे तुमच्या बायबल विद्यार्थ्याला देखील फायदा होऊ शकतो. तुम्ही त्याला त्याच्या वैयक्तिक उपयोगासाठी ही जुनी प्रकाशने घेण्याचे उत्तेजन देऊ शकता. ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षकांनी, मंडळीकडे जुन्या प्रकाशनांचा साठा असेल तर त्यातील काही प्रकाशने राज्य सभागृहातील ग्रंथालयात ठेवावीत. ही प्रकाशने जुनी असली तरी मौल्यवान आहेत. मंडळीच्या लिटरेचर काऊंटरवर या प्रकाशनांचा साठा करून ठेवण्याऐवजी त्यांना उपयोगात आणणे किती चांगले राहील!