वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ११/१ पृ. २८-३१
  • ईश्‍वरशासित ग्रंथालय संघटित कसे करावे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित ग्रंथालय संघटित कसे करावे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “ग्रंथालय चैनीसाठी नव्हे”
  • मला कोणती पुस्तके हवी आहेत?
  • तुमच्या ग्रंथालयाला संघटित करा!
  • ईश्‍वरशासित ग्रंथालय आध्यात्मिकतेत उभारणी करण्यास साहाय्यकारी ठरू शकते
  • राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९७
  • राज्य सभागृहातील ग्रंथालयासाठी नवीन व्यवस्था
    आमची राज्य सेवा—२००३
  • जुन्या प्रकाशनांचा साठा करून ठेवण्यापेक्षा त्यांचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ११/१ पृ. २८-३१

ईश्‍वरशासित ग्रंथालय संघटित कसे करावे

शेरेझॉड, नावाची एक हुशार स्पॅनिश बालिका, चार वर्षांची असताना तिच्या शिक्षिकेने संपूर्ण वर्गाला सांगितले की ते ‘सांता क्लॉजची’ चित्रे रंगवणार आहेत. लागलीच, शेरेझॉडने तिच्या शिक्षिकेला म्हटले की, ती ते करू शकणार नाही. ती म्हणाली की तिचा विवेक तिला तसे करण्यास अनुमती देणार नाही.

आश्‍चर्यचकित होऊन शिक्षिकेने तिला म्हटले, की ते एखाद्या बाहुलीचे चित्र रंगवण्यासारखे आहे आणि त्यामध्ये तर काहीच चूक नाही. शेरेझॉडने उत्तर दिले: “जर ती केवळ बाहुली आहे, तर तुमची काही हरकत नसल्यास मला माझ्या बाहुलीचे चित्र काढण्यास आवडेल.”

दुसऱ्‍या एके प्रसंगी संपूर्ण वर्गाला राष्ट्रीय झेंड्याचे चित्र काढण्यास सांगण्यात आले. पुन्हा एकदा शेरेझॉडने, ती काहीतरी दुसरे चित्र काढू शकते का असे विचारले. आणखी स्पष्टीकरण देण्याच्या उद्देशाने तिने तिच्या शिक्षिकेला शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगोची गोष्ट सांगितली.—दानीएल ३:१-२८.

काही दिवसानंतर, शिक्षिकेने तिला वाटलेले आश्‍चर्य शेरेझॉडच्या आईला सांगण्यासाठी टेलिफोन केला. ती म्हणाली, “तुमची मुलगी अनेक वेळा तिच्या विवेकाविषयी माझ्यासोबत बोलली. तुम्ही कल्पना करू शकता का? इतक्या लहान वयाची ही मुलगी, तिचा विवेक तिला का त्रास देतो याविषयी मला स्पष्टीकरण देते! बघा, तुम्ही तिला जी शिकवण देत आहात त्याच्याशी मी सहमत नाही, परंतु मी तुम्हाला याची खात्री देते की तुम्ही नक्की यशस्वी होत आहात. आणि मला तुम्हाला हे देखील सांगावेसे वाटते की मी तुमच्या मुलीची प्रशंसा व आदर करते.”

चार वर्षांची ही मुलगी बायबल-प्रशिक्षित विवेक कसा प्राप्त करू शकते? तिची आई, मॉरीनॉ, सांगते की, शेरेझॉडला तिच्या बेडरूममध्ये स्वत:चे ईश्‍वरशासित ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात तिच्या व्यक्‍तिगत टेहळणी बुरूज प्रती आहेत ज्यांना तिने रेखांकित केले आहे, प्रचारकार्यासाठी तिचे साहित्य, आणि तिचा जन्म झाल्यापासून प्रकाशित झालेली वॉचटावर संस्थेची सर्व प्रकाशने आहेत. तिच्या ग्रंथालयातील, बायबल कथांचं माझं पुस्तक याचा ऑडिओटेप तिची आवडती वस्तू आहे. ती दररोज हा टेप लावते आणि त्याच्याबरोबर तिच्या छापील पुस्तकातून स्वतःच वाचते. या बायबल वृत्तांतांनी तिला वर सांगितलेले निर्णय घेण्यास शक्य केले.

एक सुसंघटित ईश्‍वरशासित ग्रंथालय तुम्हाला आणि तुमच्या मुलांना साहाय्य करू शकेल का? एक गृह ग्रंथालय असणे का जरूरीचे आहे?

“ग्रंथालय चैनीसाठी नव्हे”

“ग्रंथालय चैनीसाठी नव्हे तर, जीवनाच्या आवश्‍यक वस्तुतील एक आहे,” असे हेन्री वॉर्ड बिखरने म्हटले. निश्‍चितच, आम्हातील बहुतेकांकडे “जीवनाच्या आवश्‍यक वस्तुतील” एक, अजाणतेत का होईना पण आहे. असे का? कारण आमच्याकडे बायबलशिवाय दुसरे काहीही नसले तरी, बायबल एक अशी वस्तू आहे जिला ग्रंथालय म्हणता येऊ शकते.

बायबल वास्तविकपणे एक सर्वश्रेष्ठ ईश्‍वरशासित ग्रंथालय आहे. चवथ्या शतकामध्ये जेरोमने, आपण ज्याला बायबल म्हणतो त्या प्रेरित पुस्तकांच्या पूर्ण संग्रहाचे वर्णन करण्याकरता बिब्लिओथिका डिविनॉ (ईश्‍वरी ग्रंथालय) हा लॅटिन वाक्यप्रयोग तयार केला. यहोवाने आपल्याला हे पवित्र ग्रंथालय व्यावहारिक मदत, शिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी पुरवले आहे. ती एक अशी गोष्ट आहे ज्याला आम्ही कधीही क्षुद्र लेखू नये. संपूर्ण बायबल बाळगणे याचाच अर्थ असा होतो, की आमच्याकडे देवाच्या गतकाळातील बहुतेक सेवकांपेक्षा अधिक विस्तारित ग्रंथालय आहे.

जेव्हा केवळ महाग हस्तलिखित प्रतीच काय त्या थोड्या प्रमाणात उपलब्ध होत्या तेव्हा ज्या घरात त्या होत्या, त्यांना स्वतःपाशी पूर्ण बायबल असल्याचा मोठा अभिमान वाटत होता. परंतु पौलाला रोममधील शेवटल्या बंदिवासात असताना शास्त्रवचनांचा अभ्यास करावयाची इच्छा होती तेव्हा, तीमथ्याला आशिया मायनरमधून काही गुंडाळ्या आणावयास त्याला सांगावे लागले—ते कदाचित इब्री शास्त्रवचनातील काही भाग असावेत. (२ तीमथ्य ४:१३) परंतु, सभास्थानात गुंडाळ्यांचा संग्रह होता, आणि येशू ख्रिस्त व प्रेषित पौल या दोघांनी त्यांच्या प्रचारकार्यात या ग्रंथालयांचा उपयोग केला. (लूक ४:१५-१७; प्रेषितांची कृत्ये १७:१-३) पहिल्या शतकात होती त्यापेक्षा अधिक प्रमाणात आता शास्त्रवचने उपलब्ध आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.

मुद्रणालयांच्या शोधाच्या साहाय्याने, आज जवळजवळ देवाचे सर्वच सेवक—त्यांची कोणतीही भाषा असली तरी—वाजवी किंमतीत संपूर्ण बायबल प्राप्त करू शकतात. आम्हालाही हे पवित्र “ग्रंथालय” संपूरक करण्याची अद्वितीय संधी आहे. एका शतकापेक्षा अधिक, “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” योग्य समयी आध्यात्मिक अन्‍न देण्यात कार्यव्यग्र आहे.—मत्तय २४:४५-४७.

परंतु जर आम्ही एक व्यक्‍तिगत ईश्‍वरशासित ग्रंथालय संघटित केले नाही तर या अमूल्य माहितीचा पूर्ण फायदा घेणे असंभवनीय आहे. ते कसे करता येईल? सर्वात प्रथम पाऊल म्हणजे, ग्रंथालयात लागणारी सर्व पुस्तके मिळवणे. असे करणे अधिक मोलाचे ठरेल कारण ते, समस्यांना हाताळण्यास व बायबल प्रश्‍नांना उत्तरे देण्यास आम्हाला लागणारी नेमकी माहिती लगेचच उपलब्ध होण्यास शक्य करील.

मला कोणती पुस्तके हवी आहेत?

तुम्ही कधी विचार केला का की, तुम्ही तुमच्या विवाहातील दळणवळणाची समस्या कशी सोडवू शकाल किंवा तुमच्या मुलांना मादक पदार्थांना नाही असे म्हणण्यास कशी मदत करू शकाल? नैराश्‍य अनुभवत असलेल्या तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही कशी मदत द्याल? देव अस्तित्वात आहे व त्याने ह्‍या दुष्टाईला अनुमती का दिली याचा कोणता पुरावा आहे याविषयीचे स्पष्ट विवरण तुम्ही देऊ शकता का? प्रकटीकरण १७ व्या अध्यायातील किरमिजी रंगाचे श्‍वापद कशाचे प्रतिनिधित्व करते?

तुमच्याजवळ पुरेसे ईश्‍वरशासित ग्रंथालय असेल तर या आणि अशासारख्या इतर प्रश्‍नांना उत्तरे दिली जाऊ शकतात. वॉचटावर संस्थेने, शास्त्रवचनीय विषयांच्या पूर्ण श्रृंखलांची चर्चा करणारी पुस्तके, माहितीपत्रके, व नियतकालिक लेख छापले आहेत. शिवाय, ही साहित्ये कौटुंबिक बाबींची चर्चा करतात, देव आणि बायबलमध्ये आमच्या विश्‍वासाची उभारणी करतात, आमच्या प्रचार करण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी मदत करतात, तसेच बायबल भविष्यवाण्या समजण्यास साहाय्य करतात.

मागील २० वर्षांदरम्यान संस्थेने छापलेली बहुतेक प्रकाशने अजूनही उपलब्ध आहेत. तुम्ही जर अलिकडेच सत्यात आला असाल तर, तुमच्या भाषेत उपलब्ध असलेले सर्व साहित्य मिळवून घेणे तुमच्या योग्यतेचे ठरेल. कदाचित असेही होऊ शकेल, की गेल्या दहा वर्षांचे टेहळणी बुरूज खंड तुमच्या भाषेत उपलब्ध असतील. उल्लेखनीय संदर्भ ग्रंथ जसे की, शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) आणि व्यापक शब्दसूची (इंग्रजी) हेही वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. परंतु, ही सर्व पुस्तके प्राप्त करून घेणे हे फक्‍त पहिले पाऊल आहे.

तुमच्या ग्रंथालयाला संघटित करा!

तुम्हाला हवे असलेले अमुक पुस्तक कोठेतरी आहे हे केवळ ठाऊक असण्यापेक्षा ते कोठे मिळेल हे माहीत असणे अधिक महत्त्वाचे आहे. आम्हाला हवा असलेला संदर्भ ग्रंथ शोधण्यात आम्हाला बराच वेळ लागत असला तर मग आपली आवड निघून जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्‍या बाजूला पाहता, जर आपण आपली पुस्तके व्यवस्थित, एका सोईस्कर ठिकाणी लावून ठेवली तर आम्हाला व्यक्‍तिगत अभ्यास करण्यास अधिक प्रेरणा मिळेल.

शक्य असल्यास, सर्व ईश्‍वरशासित पुस्तके एका ठिकाणी ठेवली तर ते साहाय्यकारी होऊ शकते. तयार पुस्तकांची कपाटे घेण्याची आपली ऐपत नसल्यास, ती अगदी स्वस्त किंमतीत बनवली जाऊ शकतात, शिवाय त्यांच्यासाठी जास्त जागाही लागत नाही. पुस्तके सहजपणे घेता येतील अशारीतीने त्यांची मांडणी करणे महत्त्वाचे आहे. माळ्यावर टाकलेल्या पुस्तकांचा फार कमी उपयोग होतो व शिवाय त्यांच्यावर धूळही जमा होते.

पुस्तकांना संघटित करणे हे दुसरे पाऊल आहे. पुस्तकांना तर्कसंगत क्रमाने लावण्यात थोडासा वेळ घालवणे प्रतिफळदायी ठरते.

तुमच्या कुटुंबातील बहुतेक जण यहोवाचे साक्षीदार नसल्यास काय? तुम्हाला हवे तसे ग्रंथालय तुम्ही संघटित करू शकत नसला तरी, तुम्ही तुमच्या खोलीत एखादे पुस्तकाचे कपाट ठेवू शकता ज्यामध्ये निदान काही शास्त्रवचनीय प्रकाशने राहतील.

ईश्‍वरशासित ग्रंथालय आध्यात्मिकतेत उभारणी करण्यास साहाय्यकारी ठरू शकते

आपल्या पुस्तकांना व्यवस्थित लावल्यावर, आम्हाला माहिती शोधण्यास मदत करणारी एखादी पद्धत आवश्‍यक आहे. आमची स्मरणशक्‍ती प्रमादपूर्ण असू शकते, शिवाय आम्ही आमच्या ईश्‍वरशासित ग्रंथालयातील प्रत्येक पुस्तकाच्या विषयांशी व्यक्‍तिगतरीत्या परिचित नसू. तरीसुद्धा, ग्रंथालयातील सर्व माहिती तत्परतेने उपलब्ध असते. तुमच्या भाषेत उपलब्ध असल्यास, वॉचटावर प्रकाशनांची निर्देशसूची (इंग्रजी) आम्हाला थोडक्या वेळात कोणत्याही विषयावर विशिष्ट माहिती शोधण्यास साहाय्य करील.

अनेक वर्षांसाठी खास पायनियर व वडील या नात्याने कार्य केलेल्या कुल्यॉनने म्हटले की, त्याच्या धाकट्या मुलाला व्यक्‍तिगत अभ्यास करण्यास शिकवण्यासाठी निर्देशसूची खूप बहुमूल्य आहे. “एके दिवशी अलिकडेच, सात वर्षांचा जायरो शाळेतून आला आणि मला विचारले, ‘डॅडी, संस्थेने डायनोसॉरबद्दल काय म्हटले आहे?’ आम्ही लगेच निर्देशसूची उघडून ‘डायनोसॉर’ हा शब्द त्यात पाहिला. आणि लागलीच आम्हाला त्या विषयावरची सावध राहा! श्रृंखला सापडली. [फेब्रुवारी ८, १९९०] त्याच दिवशी, जायरोने ती वाचण्यास सुरवात केली. त्याला आधीच माहीत होते, की आमच्या ईश्‍वरशासित ग्रंथालयात जवळजवळ प्रत्येक विषयावर उपयोगी माहिती आहे. व्यक्‍तिगतरीत्या मला याची खात्री पटली आहे की, आमची मुले ईश्‍वरशासित ग्रंथालयाचा चांगला उपयोग करावयास शिकतात तेव्हा ते त्यांना आध्यात्मिकरीत्या वाढण्यास मदत करते. ते तर्क करण्यास शिकतात, शिवाय व्यक्‍तिगत अभ्यास आनंददायी असू शकतो हेही त्यांना कळून येते.”

सुरवातीला उल्लेखलेली शेरेझॉड हिचे वडील फॉस्टो यांना असे वाटते, की तुम्ही तुमच्या मुलांना लहान वयातच ईश्‍वरशासित ग्रंथालयाचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरवात करावी. ते म्हणतात, “शेरेझॉड आता सहा वर्षांची आहे आणि आम्ही तिला निर्देशसूची, याचा वापर कसा करावा हे दाखवले आहे. तिला पृथ्वीवरील नंदनवनाच्या आशेचे आकर्षण असल्यामुळे, आम्ही निर्देशसूची, यातून ‘नंदनवन’ हा शब्द दाखवला व तेथे सांगितलेले टेहळणी बुरूज लेख पाहून अशारीतीने सुरवात केली. बहुतेक वेळा आम्ही तिला चित्रे दाखवत असू. तरीसुद्धा, निर्देशसूची हे आमच्या गृह ग्रंथालयात माहिती शोधण्याची गुरूकिल्ली आहे हे ती या पद्धतीद्वारे शिकली. ती स्वतः जे शिकली होती ते तिला पूर्णपणे समजले हे आम्हाला तेव्हा कळले जेव्हा एके दिवशी शाळेवरून घरी आल्यावर तिला ईस्टर साजरा करण्याबद्दलचा प्रश्‍न आला. तिने तिच्या आईला विचारले की, ‘आपण निर्देशसूची का पाहू नये बरे?’”

आमचे वय कितीही असले तरी, बायबल आपल्याला ‘सर्व गोष्टींची पारख करण्यास; चांगले ते बळकट धरण्यास’ उत्तेजन देते. (१ थेस्सलनीकाकर ५:२१) यासाठी आपल्याला शास्त्रवचने काय म्हणतात त्याचे परीक्षण करणे आवश्‍यक आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:११) आमच्याकडे सुसंघटित ईश्‍वरशासित ग्रंथालय असले तर अशाप्रकारचे संशोधन करणे आनंददायी ठरू शकते. ज्या ज्या वेळेला आम्ही, भाषण तयार करण्यासाठी, एखादी समस्या सोडवण्यास व्यावहारिक सल्ला शोधण्यासाठी, किंवा वेधक माहिती मिळवण्यासाठी यशस्वीपणे आमच्या ग्रंथालयाचा उपयोग करतो त्या त्या वेळेला ते आमच्यावर आमच्या ग्रंथालयाचे व्यावहारिक मूल्य बिंबविल.

शेरेझॉडचे पालक स्पष्टपणे म्हणतात की: “एका ख्रिस्ती घराण्यात, ईश्‍वरशासित ग्रंथालय निश्‍चितच चैनीसाठी नाही!”

[३० पानांवरील चौकट]

तुम्ही तुमच्या पुस्तकांची रचना कशाप्रकारे कराल?

तुमची पुस्तके कशी लावावीत यावर कोणताही पक्का नियम नाही. तरीसुद्धा, पुढील तर्कसंगत विभाग, तुमची पुस्तके उपलब्ध असलेल्या गोष्टीनुसार करू शकता याचे उदाहरण पुरवते.

१. बायबलच्या विशिष्ट भागांतील एकेका वचनाचे विश्‍लेषण असलेली पुस्तके

(उदाहरणार्थ: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, “राष्ट्रांना कळून येईल की मी यहोवा आहे”—कसे? (इंग्रजी), “तुझी इच्छा पृथ्वीवर पूर्ण होवो” (इंग्रजी))

२. कौटुंबिक जीवनाशी निगडित पुस्तके

(उदाहरणार्थ: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे, तरुण लोक विचारतात—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी), बायबल कथांचं माझं पुस्तक)

३. बायबल आणि संदर्भग्रंथ

(उदाहरणार्थ: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरेन्स, इतर बायबल, वॉचटावर प्रकाशनांची निर्देशसूची (इंग्रजी), व्यापक शब्दसूची (इंग्रजी), शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), किंग्डम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिपचर्स, एखादा चांगला शब्दकोष)

४. मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशालेसाठी वापरण्यात येणारी चालू पुस्तके

५. ऑडियोकॅसेट आणि व्हिडिओ

६. टेहळणी बुरूज व सावध राहा! यांचे खंड

७. यहोवाच्या साक्षीदारांचा इतिहास

(उदाहरणार्थ: यहोवाच्या साक्षीदारांचा वार्षिक अहवाल, यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक)

८. सेवाकार्यात आम्ही नियमितपणे वापरत असलेली पुस्तके आणि माहितीपत्रके

(उदाहरणार्थ: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात चिरकाल जगू शकाल, शास्त्रवचनांतून तर्क करणे (इंग्रजी), जीवन—ते कोठून आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी), मानवजातीचा देवासाठी शोध (इंग्रजी), एकमेव खऱ्‍या देवाच्या उपासनेतील ऐक्य)

[३१ पानांवरील चित्रं]

शेरेझॉड आधीच एक उत्तम बायबल विद्यार्थिनी बनली आहे

[३१ पानांवरील चित्रं]

हा मुलगा तरुण असूनही ईश्‍वरशासित ग्रंथालयाचा उपयोग करीत आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा