वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/११ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०११
आमची राज्य सेवा—२०११
km ४/११ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२५ एप्रिल २०११ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक ७ मार्च ते २५ एप्रिल २०११ पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यात चर्चा करण्यात आलेल्या साहित्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.

१. कोणत्या अर्थाने “त्या देशाचे पुष्कळ लोक यहुदी झाले?” (एस्तेर ८:१७) [टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ६ परि. ३]

२. सैतानाला यहोवासमोर येऊन उभे राहण्यास अनुमती का देण्यात आली होती? (ईयोब १:६; २:१) [टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ३ परि. ६]

३. “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो?” सैतानाने विचारलेल्या या प्रश्‍नाचा काय अर्थ होतो? (ईयोब १:९) [टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ८ परि. ५]

४. यहोवा “मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे” हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपला आत्मविश्‍वास का वाढतो? (ईयोब ९:४) [टेहळणी बुरूज०७ ६/१ पृ. १६ परि. १६]

५. माणूस “पाण्याप्रमाणे दुष्टाई पितो” या अलीफजच्या विधानावरून, सैतानाची विचारसरणी कशी दिसून येते? (ईयोब १५:१६, पं.र.भा.) [टेहळणी बुरूज१० २/१५ पृ. २० परि. १-२]

६. ईयोब १९:२ मध्ये ईयोबाने अगदी त्रासून काढलेल्या उद्‌गारांवरून आपण काय शिकतो? (ईयोब १९:२) [टेहळणी बुरूज०७ ६/१ पृ. ३२]

७. शेवटपर्यंत विश्‍वासू राहणे ईयोबाला कशामुळे शक्य झाले? (ईयोब २७:५) [टेहळणी बुरूज०९ ४/१५ पृ. ६ परि. १७]

८. इतरांना गरज असते तेव्हा आपण ईयोबाप्रमाणे काय करू शकतो? (ईयोब २९:१२, १३) [टेहळणी बुरूज०२ ५/१५ पृ. २२ परि. १९; टेहळणी बुरूज९४ ९/१५ पृ. २४ परि. २]

९. अलीहूचा सल्ला ईयोबाच्या इतर तीन सोबत्यांपेक्षा वेगळा कसा होता? (ईयोब ३३:१, ६) [टेहळणी बुरूज९५ २/१५ पृ. २९ परि. ३]

१०. यहोवाच्या अद्‌भुत कृत्यांवर मनन केल्यामुळे आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे? (ईयोब ३७:१४) [टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ६ परि. ३]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा