प्रश्न पेटी
◼ एका प्रगतीशील बायबल विद्यार्थ्याबरोबर कधीपर्यंत अभ्यास करावा?
एका प्रगतीशील बायबल विद्यार्थ्याबरोबर जोपर्यंत, बायबल नेमके काय शिकवते? आणि “देवाच्या प्रेमात टिकून राहा” ही दोन पुस्तके पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याच्याबरोबर अभ्यास चालू ठेवावा. ही दोन पुस्तके पूर्ण होण्याआधीच विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाला असला तरी त्याच्याबरोबर या पुस्तकांचा अभ्यास पूर्ण करावा. त्याच्या बाप्तिस्म्यानंतरही, आपण त्याच्याबरोबर केलेल्या अभ्यासाचे तास, पुनर्भेटी व बायबल अभ्यास यांचा रिपोर्ट टाकू शकतो. तुमच्याबरोबर दुसरा प्रचारक असेल व त्यानेही अभ्यासात सहभाग घेतला असेल तर तोही तास मोजू शकतो.—एप्रिल २०१० आमची राज्य सेवा पृष्ठ ६ पाहा.
नवीन विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण अभ्यास संपवण्याआधी सत्यातील त्यांचा आध्यात्मिक पाया मजबूत होणे खूप आवश्यक आहे. त्यांना येणाऱ्या अडचणींना तोंड देता यावे म्हणून ख्रिस्तात ‘मूळावण्याची’ व “विश्वासात दृढ” होण्याची गरज आहे. (कलस्सै. २:६, ७; २ तीम. ३:१२; १ पेत्र ५:८, ९) त्याचबरोबर, इतरांना प्रभावीपणे शिकवता यावे म्हणून आधी त्यांनी स्वतः ‘सत्याचे परिपूर्ण ज्ञान’ घेणे अत्यंत गरजेचे आहे. (१ तीम. २:४) आपल्या विद्यार्थ्यांबरोबर दोन पुस्तकांचा अभ्यास पूर्ण करण्याद्वारे, त्यांना आपण ‘जीवनाकडे जाणाऱ्या मार्गावर’ आपले पाय घट्ट रोवण्यास मदत करत असतो.—मत्त. ७:१४.
बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेण्यास योग्य आहे की नाही हे ठरवताना वडिलांनी, त्याला बायबलच्या मूलभूत शिकवणी स्पष्टपणे समजल्या आहेत आणि तो त्याप्रकारे वागत आहे किंवा नाही यांची खात्री करावी. वडिलांनी खासकरून ज्या विद्यार्थ्याचे अभ्यासाचे पहिले पुस्तक अद्याप पूर्ण झालेले नाही त्याच्या बाप्तिस्म्याचा विचार करताना दक्षता बाळगावी. जर बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेण्यास तयार नाही, तर वडिलांनी त्याला व्यक्तिगत मदत देणे गरजेचे आहे जेणेकरून, तो पुढे जाऊन बाप्तिस्मा घेण्याच्या योग्यतेचा बनू शकेल.—‘जा लोकांस शिष्य करा, त्यांना बाप्तिस्मा द्या’ या पुस्तिकेतील पृष्ठे ५८-६० पाहा.
[२ पानांवरील संक्षिप्त आशय]
नवीन विद्यार्थ्यांबरोबर संपूर्ण अभ्यास संपवण्याआधी सत्यातील त्यांचा आध्यात्मिक पाया मजबूत होणे खूप आवश्यक आहे