“विश्वासात दृढ” होण्यास त्यांना मदत करा
दरवर्षी अडीच लाखांपेक्षा अधिक लोकांचा बाप्तिस्मा होत असल्याचे पाहून कळते, की एकत्र करण्याच्या कामावर यहोवाचा आशीर्वाद आहे. (अनु. २८:२) पण, विद्यार्थ्याने बाप्तिस्मा घेतला की प्रचारक त्याचा अभ्यास बंद करून दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करू लागतात. आणि सेवेमध्ये अधिक वेळ देता यावा म्हणून विद्यार्थीदेखील अभ्यास बंद करतील. पण, विद्यार्थ्यांचा सत्यात आध्यात्मिक पाया मजबूत होणे महत्त्वाचे आहे. त्यांनी ख्रिस्तात “मुळावलेले” व “विश्वासात दृढ” असण्याची गरज आहे. (कलस्सै. २:६, ७; २ तीम. ३:१२) म्हणून, विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतरही त्याने बायबल काय शिकवते आणि देवाचे प्रेम ही दोन्ही पुस्तके पूर्ण होईपर्यंत आपला अभ्यास चालू ठेवावा.—एप्रिल २०११ आपली राज्य सेवा पृष्ठ २ पाहा.