२१ मार्चने च्या सप्ताहाचा आराखडा
२१ मार्चने सुरू होणारा सप्ताह
गीत ४७ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
टेहळणी बुरूज०८ ११/१५ पृ. १२-१४, परि. १-११ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: ईयोब ६-१० (१० मि.)
क्र. १: ईयोब ८:१-२२ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: टिकाऊ विवाहाकरता दुसरी गुरुकिल्ली—कुटुंब पृ. ३०, ३१ परि. ७-१० (५ मि.)
क्र. ३: मत्तय १०:१६ मध्ये दिलेला सल्ला आपण कसा लागू करू शकतो? (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. एप्रिल महिन्यात कोणते प्रकाशन सादर करणार ते सांगा, ज्यांनी नियतकालिके स्वीकारली आहेत त्यांची पुनर्भेट घेताना बायबल अभ्यास कसा सुरू करावा याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: उत्तर देताना बायबलचा उपयोग करा. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, पृष्ठे १४३-१४४ वरील माहितीवर आधारित चर्चा. स्थानिक क्षेत्रात घरमालक प्रचारकाला प्रश्न विचारत असल्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. पहिल्या प्रात्यक्षिकात, प्रचारक अगदी बरोबर उत्तर देतो पण बायबलचा उपयोग करत नाही. दुसऱ्या प्रात्यक्षिकात प्रचारक बायबलचा उपयोग करून उत्तर देतो. दुसरे प्रात्यक्षिक चांगले का होते, हे श्रोत्यांना विचारा.
१५ मि: “एप्रिल २ पासून स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिकेचे वाटप.” प्रश्न व उत्तरे. सर्व प्रचारकांना स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकेची एकएक प्रत वाटा आणि त्यातील ठळक मुद्दे सांगा. स्थानिक क्षेत्र उरकण्यासाठी काय योजना केली आहे ते सांगा. एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ५ व प्रार्थना