एप्रिल २ पासून स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिकेचे वाटप
१. या वर्षी आपण स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकांचे वाटप कधीपासून करणार आहोत, आणि या वार्षिक मोहिमेचे महत्त्व काय?
१ एप्रिल २ ते १७ पर्यंत, आपण वर्षाच्या एका खास कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेचे वाटप करणार आहोत. हा खास कार्यक्रम म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी. गत काळात, अनेक लोकांनी या वार्षिक मोहिमेदरम्यान चांगला प्रतिसाद दाखवला. उदाहरणार्थ, स्मारकविधीच्या दिवशी एका स्त्रीने शाखा कार्यालयाला फोन करून म्हटले: “मी आत्ताच घरी आले तेव्हा मला दरवाजाच्या खाली एक आमंत्रण पत्रिका मिळाली, मला जायची इच्छा आहे, पण वेळ माहीत नाही.” शाखा कार्यालयातील बांधवाने, तिला आमंत्रण पत्रिकेवर वेळ कोठे दिली आहे ते सांगितले. तिने त्या बांधवाला “मी तुमच्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहेन” असे वचन देऊन संभाषण संपवले.
२. आमंत्रण पत्रिका देताना आपण काय म्हणू शकतो?
२ आपण हे कसे करू: क्षेत्र पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे मर्यादित वेळ असल्याकारणाने, थोडक्यात बोलणे चांगले राहील. आपण म्हणू शकतो: “संपूर्ण जगभरात रविवार १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या महत्त्वाच्या वार्षिक कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. [घरमालकाच्या हातात आमंत्रण पत्रिका द्या.] ही येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीची तारीख आहे. याप्रसंगी बायबल आधारित भाषण दिले जाईल. या भाषणात, येशूच्या खंडणीमुळे आपल्याला काय फायदा होणार आहे हे सांगितले जाईल. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. आपल्या भागात होणाऱ्या या कार्यक्रमाची वेळ व ठिकाण आमंत्रण पत्रिकेत दिले आहे.” तुमच्या क्षेत्रात विरोध होत असेल तर, आमंत्रण पत्रिका देण्याआधी घरमालक ऐकण्यास इच्छुक आहे का ते तुम्हाला पाहावे लागेल.
३. शक्य होईल तितक्या लोकांना आपण आमंत्रित कसे करू शकतो?
३ मंडळीकडे खूप क्षेत्र असल्यास दाराला कुलुपे असलेल्या घरी देखील आमंत्रण पत्रिका देण्याविषयी वडील आपल्याला सांगतील. मात्र असे करताना, आमंत्रण पत्रिका अशा ठिकाणी ठेवावी जेथे लोकांचे सहजासहजी लक्ष जाणार नाही. तुम्ही ज्यांच्या पुनर्भेटी घेता, तसेच नातेवाईक, सोबत काम करणारे, शाळासोबती, आणि तुमची ओळख असणाऱ्या लोकांनाही आमंत्रित करा. शनिवारी आणि रविवारी आमंत्रण पत्रिका वाटत असताना जिथे उचित आहे तिथे नियतकालिके देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या एप्रिल महिन्यात सहायक पायनियरिंग करून या मोहिमेत उत्साहाने अधिक सहभाग घेऊ शकाल का?
४. आस्थेवाईक लोकांनी स्मारकविधीला उपस्थित राहावे अशी आपली इच्छा का आहे?
४ उपस्थित राहणाऱ्यांना किती जबरदस्त साक्ष मिळणार आहे! खंडणीची तरतूद करण्यामागे देवाने दाखवलेल्या अपार प्रेमाबद्दल ते ऐकतील. (योहा. ३:१६) देवाचे राज्य मानवांना कसे फायदेकारक ठरेल याबाबतीत ते शिकतील. (यश. ६५:२१-२३) अधिक माहितीसाठी आणि बायबल अभ्यासासाठी त्यांनी अटेन्डंन्टला भेटावे असेही त्यांना भाषणानंतर सांगितले जाईल. या मोहिमेला प्रामाणिक अंतःकरणाच्या अनेकांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि आपल्या बरोबर स्मारकविधीला उपस्थित राहावे हीच आपली प्रार्थना आहे!