आपली कृतज्ञता व्यक्त करू या १७ एप्रिल रोजी स्मारकविधी साजरा केला जाईल
१. स्मारकविधी दरम्यान आपणही स्तोत्रकर्त्याप्रमाणे कोणती मनोवृत्ती दाखवणे उचित आहे?
१ यहोवाची अगणित दयाळू कृत्ये आणि त्याने आपल्या लोकांची कशी सुटका केली याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत स्तोत्रकर्त्याने विचारले: “परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?” (स्तो. ११६:१२) आज देवाच्या उपासकांकडे कृतज्ञता दाखवण्याची अनेक कारणे आहेत. देवाच्या प्रेरणेने स्तोत्रकर्त्याने जे लिहिले त्याच्या अनेक शतकांनतर यहोवाने मानवांना एक सर्वात उत्कृष्ट भेट दिली. ती भेट म्हणजे येशूचे खंडणी बलिदान. १७ एप्रिल रोजी स्मारकविधी साजरा करण्याची तयारी करताना आपल्याजवळही देवाचे आभार मानण्याचे उत्तम कारण आहे.—कलस्सै. ३:१५.
२. कोणकोणत्या कारणांमुळे आपण खंडणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो?
२ खंडणीमुळे मिळणारे आशीर्वाद: खंडणीमुळे आपल्या “पापांची क्षमा” मिळू शकते. (कलस्सै. १:१३, १४) यामुळे आपण यहोवाची उपासना शुद्ध विवेकाने करू शकतो. (इब्री ९:१३, १४) आणि प्रार्थनेद्वारे यहोवाशी आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो. (इब्री ४:१४-१६) जे खंडणी बलिदानावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवनाची सर्वोत्तम आशा आहे!—योहा. ३:१६.
३. खंडणीबद्दल आपली कृतज्ञता आपण यहोवाला कशी दाखवू शकतो?
३ आपण कृतज्ञता कशी दाखवतो: कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे, स्मारकविधीचे बायबल वाचन करून त्यावर मनन करणे. खंडणी आपल्यासाठी किती मोलवान आहे हे आपण देवाला मनापासून प्रार्थना करून सांगू शकतो. (१ थेस्सलनी. ५:१७, १८) येशूच्या आज्ञेचे पालन करून स्मारकविधीला उपस्थित राहण्याद्वारे आपण त्याचे आभार मानू शकतो. (१ करिंथ. ११:२४, २५) होता होईल तितक्या लोकांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊन आपण यहोवाच्या महान प्रेमाचे अनुकरण करू शकतो.—यश. ५५:१-३.
४. आपला दृढनिश्चय काय असला पाहिजे?
४ यहोवाचे कृतज्ञ सेवक, स्मारकविधीला इतर सभेप्रमाणे लेखत नाहीत. कारण हा विधी वर्षातला एक महत्त्वपूर्ण विधी आहे! जसजसा स्मारकविधी जवळ येतो तसतसा आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे हा दृढनिश्चय करू. त्याने लिहिले: “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको.”—स्तो. १०३:२.