फेब्रुवारी २८ च्या सप्ताहाचा आराखडा
२८ फेब्रुवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
टेहळणी बुरूज०८ ४/१५ पृ. १८-२०, परि. ९-१७ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: एस्तेर १-५ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: तुमचा संदेश सकारात्मक ठेवा. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, पृष्ठ २०२ वरील माहितीवर आधारित चर्चा. पुढील महिन्याच्या सादरतेचा उपयोग करून व शेवटल्या परिच्छेदातील सूचनांचा अवलंब करून प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे पुस्तिकेतून लाभ मिळवणे. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२०११ यातील प्रस्तावनेच्या आधारावर चर्चा. दररोज दैनिक वचनावर चर्चा करण्यास सर्वांना प्रोत्साहन द्या. दैनिक वचनावर चर्चा करण्यासाठी श्रोत्यांनी कोणती वेळ ठरवली आहे आणि यातून कोणते लाभ मिळाले आहेत हे सांगण्यास त्यांना उत्तेजन द्या. २०११ च्या वार्षिक वचनाबद्दल थोडक्यात सांगा. “क्षेत्र सेवेच्या सभेत दैनिक वचनाची चर्चा करण्याची गरज नाही” या लेखाची चर्चा करा.
१० मि: प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—विद्यार्थी प्रश्न विचारतो तेव्हा. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००५ पृष्ठ ६ वरील लेखावर आधारित भाषण. स्मारकविधीच्या वेळी फक्त काहीच लोक भाकरी खातात व द्राक्षारस घेतात असे का, असा प्रश्न एक बायबल विद्यार्थी विचारत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. असा प्रश्न विचारल्याबद्दल बायबल अभ्यास चालक विद्यार्थ्याची प्रशंसा करतो, तो प्रश्न लिहून घेतो आणि अभ्यास झाल्यानंतर त्याची चर्चा करू, असे सुचवतो. अभ्यासानंतर संचालक विद्यार्थ्याला बायबल काय शिकवते पुस्तकातील २०६-२०८ पृष्ठांवरील माहिती दाखवतो.
गीत ३३ व प्रार्थना