क्षेत्र सेवेच्या सभेत दैनिक वचनाची चर्चा करण्याची गरज नाही
आतापर्यंत क्षेत्र सेवेदरम्यान, सेवा कार्याच्या संदर्भात दैनिक वचन असल्यास बांधव कदाचित थोडक्यात त्याचा उल्लेख करत असावेत. पण आता यात काही फेरबदल करण्यात आला आहे. क्षेत्र सेवा सभेदरम्यान शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे याच्या आधारावर चर्चा केली जाणार नाही. पण, ही सभा घेणारे बंधू पहिल्याप्रमाणेच बायबल, आमची राज्य सेवा, सेवा प्रशाला पुस्तक (हिंदी), पवित्र शास्त्रीय चर्चा कशा कराव्यात व त्या कशा चालू ठेवाव्यात या पुस्तिकेचा आणि सेवेशी संबंधित असलेल्या पुस्तकांचा उपयोग करू शकतात. क्षेत्र सेवेत जाणाऱ्यांसाठी काही व्यावहारिक मुद्दे सांगण्याकरता सभा संचालकाने पूर्वतयारी केली पाहिजे. जसे आतापर्यंत होत आहे तसेच, आताही ही सभा १० ते १५ मिनिटांच्या वर असू नये. आणि ही सभा जर मंडळीच्या सभेनंतर होणार असेल तर आणखी कमी वेळेत उरकली जावी.