विश्वासात नसलेल्या सोबत्याला सत्य स्वीकारण्यास मदत करा
१. जर कोणा प्रचारकाचा जोडीदार सत्यात नसेल तर त्याने सत्य स्वीकारावे अशी इच्छा फक्त ख्रिस्ती सोबत्याचीच नव्हे तर इतरांचीही का असते?
१ तुमच्या मंडळीत असे काही प्रचारक आहेत का ज्यांचे जोडीदार सत्यात नाहीत? जर असतील तर, आपल्या जोडीदारानेही आपल्यासोबत खरी उपासना करावी अशी या प्रचारकांची इच्छा असेल. पण फक्त त्यांचीच अशी इच्छा नाही. तर देवाप्रमाणे संपूर्ण मंडळीची “अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:४) आपल्या मंडळीत जर कोणा प्रचारकाचा जोडीदार विश्वासात नसेल तर अशा जोडीदारांना आपण कशी मदत करू शकतो?
२. समंजसपणा आपल्याला सत्यात नसलेल्या जोडीदाराला समजून घेण्यास कशा प्रकारे मदत करू शकतो?
२ पहिली गोष्ट आपण, सत्यात नसलेला सोबती कसा विचार करतो ते समजून घेतले पाहिजे. सत्यात नसलेले बरेच सोबती आपल्या कुटुंबावर, पत्नीवर आणि मुलांवर प्रेम करतात. कदाचित ते अगदी प्रामाणिकपणे त्यांचे धार्मिक विश्वास बाळगत असतील. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल त्यांना जी थोडीफार माहिती आहे ती कदाचित त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितली असावी. आणि त्यांच्या मित्रांजवळची माहिती अपूरी किंवा पूर्वग्रहांवर आधारित असेल. आपला जोडीदार पूर्वी जो वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवायचा तो आता उपासनेत खर्च करत आहे हे पाहून सत्यात नसलेल्या त्यांच्या सोबत्यांना आवडणार नाही. समंजसपणा आपल्याला सत्यात नसलेल्या व्यक्तीबरोबर दयेने व आदराने व्यवहार करण्यास तसेच त्यांच्या सोबत असताना विनाकारण घाबरण्याचे टाळण्यास मदत करेल.—नीति. १६:२०-२३.
३. सत्यात नसलेल्या सोबत्याला सत्याकडे आकर्षित करण्याचा उत्तम मार्ग कोणता असू शकतो?
३ वैयक्तिक आस्था: सत्यात नसलेल्या जोडीदाराला आपण, एका उत्तम मार्गाने सत्याकडे आकर्षित करू शकतो. निदान सुरुवातीला तरी, बायबलच्या चर्चांद्वारे नव्हे तर आपल्या चांगल्या कार्यांद्वारे आपण त्याला प्रभावीत करू शकतो. (१ पेत्र ३:१, २) यासाठी तुम्ही त्याच्यात वैयक्तिक आस्था घेणे महत्त्वाचे आहे. मंडळीतील बहिणी आपल्या बांधवाच्या सत्यात नसलेल्या पत्नींमध्ये व बांधव सत्यात नसलेल्या पतींमध्ये वैयक्तिक आस्था घेऊ शकतात. ते कसे?
४. आपण वैयक्तिक आस्था कशी दाखवू शकतो?
४ तुम्ही जर आतापर्यंत जोडीदाराला भेटला नसाल तर ख्रिस्ती सोबत्याशी बोलल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. सत्यात नसलेल्या सोबत्याने आपल्याला थंड प्रतिसाद दिला तर निराश होऊ नका. आपला मैत्रीपूर्ण स्वभाव आणि त्यांच्यात आपण घेत असलेली वैयक्तिक आस्था यांमुळे यहोवाच्या साक्षीदारांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो. (रोम. १२:२०) काही प्रौढ ख्रिश्चन, सत्यात नसलेल्या सोबत्याला त्याच्या कुटुंबासमवेत जेवायला बोलावतात जेणेकरून ते एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू शकतील आणि यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेला त्यांचा कोणताही पूर्वग्रह मिटेल. कसेही करून त्यांच्यातील चर्चा आध्यात्मिक विषयांकडे वळवून सत्यात नसलेल्या सोबत्याला त्यावर जबरदस्तीने आपले मत मांडायला लावण्याऐवजी त्याच्या किंवा तिच्या आवडीच्या विषयांवर ते बोलतात. कालांतराने सत्यात नसलेल्या जोडीदाराची तुमच्यासोबत ओळख होईल व तो खुल्या मनाने बोलू लागेल तेव्हा त्याच्याबरोबर बायबलची चर्चा सुरू केली जाऊ शकते. किंवा आपला जोडीदार नक्की काय शिकत आहे हे पाहण्यासाठी तो कदाचित आपल्या सभेला उपस्थित राहण्यास तयार होईल, कारण मंडळीमधील काही बांधवांशी त्याची ओळख झाली असेल. सत्य जाणून घ्यायला जरी तो तयार नसला तरी सत्यात असलेल्या त्याच्या जोडीदाराला तो देत असलेल्या साहाय्याची तुम्ही प्रशंसा करू शकता.
५. वडील कशा प्रकारे सत्यात नसलेल्या जोडीदाराला मदत करू शकता?
५ वडिलांनी खासकरून, सत्यात नसलेल्या जोडीदाराला मदत केली पाहिजे आणि साक्ष देण्याची एकही संधी सोडली नाही पाहिजे. बायबल संबंधित चर्चा करण्यास आधी नकार देत असलेला सत्यात नसलेला जोडीदार, जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल किंवा त्याला एखादा गंभीर आजार झाला असेल तर आता तो बायबलमधून, त्याला जेव्हा प्रोत्साहन दिले जाते तेव्हा कदाचित ते ऐकेल. किंवा, ज्यांचा विवाहसोबती सत्यात नाही अशा आपल्या बंधूच्या अथवा भगिनीच्या घरात जेव्हा समस्या येतात, जसे की कुटुंबातील कोणा सदस्याचा मृत्यू झाल्यावर कुटुंबाला सांत्वन देण्याकरता वडील जातात तेव्हा ते सत्यात नसलेल्या जोडीदाराला त्यांच्या सोबत बसण्यास सांगू शकतात.
६. सत्यात नसलेल्या जोडीदाराला मदत करण्याची काही कारणे कोणती आहेत?
६ विचार करा, मंडळीतील आपल्या ख्रिस्ती बांधवाची पत्नी अथवा भगिनीचा पती जेव्हा सत्य स्वीकारतो तेव्हा त्यांना किती आनंद होत असेल! या आनंदाच्या क्षणी यहोवाला, देवदूतांना व मंडळीतील सगळ्यांना खूप आनंद होतो. (लूक १५:७, १०) सत्यात नसलेला जोडीदार सुरुवातीला काही प्रतिसाद देत नसला तरी आपण करत असलेल्या प्रयत्नांमुळे यहोवा खूश होतो, या जाणीवेने आपल्याला आनंद होतो कारण, “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.”—२ पेत्र ३:९.
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
सत्यात नसलेल्या जोडीदाराला आपण, एका उत्तम मार्गाने सत्याकडे आकर्षित करू शकतो. निदान सुरुवातीला तरी, बायबलच्या चर्चांद्वारे नव्हे तर आपल्या चांगल्या कार्यांद्वारे आपण त्याला प्रभावीत करू शकतो.