पुरुषांना साक्ष देण्याच्या आव्हानाचा सामना करणे
१. राज्याच्या संबंधाने कोणती निकडीची गरज निर्माण झाली आहे?
१ आज राज्यप्रचाराचे काम जोमाने वाढत आहे व त्यामुळे पुढाकार घेण्यासाठी आध्यात्मिक रित्या प्रौढ पुरुषांची गरज निर्माण झाली आहे. (मार्क ४:३०-३२; प्रे. कृत्ये २०:२८; १ तीम. ३:१-१३) पण, काही ठिकाणी स्त्रियांपेक्षा पुरुष कमी प्रमाणात सत्य स्वीकारत आहेत. काही संस्कृतीत, मुलांना धार्मिक शिक्षण द्यायची जबाबदारी बायकोची आहे असे पुरुष समजतात. पुरुषांनी त्यांच्या आध्यात्मिक गरजांबद्दल जागृत व्हावे व खऱ्या उपासनेत आपल्याबरोबर सहभागी व्हावे म्हणून आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
२. पौल व पेत्र यांनी पुरुषांना साक्ष दिल्यामुळे कोणते चांगले परिणाम दिसून आले?
२ पुरूषांना साक्ष देण्यावर लक्ष केंद्रित करा: एखाद्या कुटुंबात जेव्हा कुटुंबप्रमुख सत्य स्वीकारतो तेव्हा त्याचा कुटुंबातील इतरांवरही परिणाम होतो व ते खरी उपासना स्वीकारू शकतात. उदारणार्थ, प्रचार केल्यामुळे तुरूंगात टाकलेल्या पौल व सीला यांनी एका तुरूंग अधिकाऱ्याला प्रचार केला. परिणामस्वरूप, या अधिकाऱ्याने व त्याच्या संपूर्ण घराण्याने बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कृत्ये १६:२५-३४) करिंथमध्ये पौलाने केलेल्या प्रचारामुळे “सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला.” (प्रे. कृत्ये १८:८) ‘नीतिमान व देवाचे भय बाळगणाऱ्या,’ कर्नल्ये या शताधिपतीला प्रचार करण्यासाठी यहोवाने पेत्राचा उपयोग केला. कर्नेल्येने त्याचे नातेवाईक व जवळचे मित्र यांसोबत बाप्तिस्मा घेतला.—प्रे. कृत्ये १०:१-४८.
३. फिलिप्पाचे अनुकरण करून आपण कोणकोणत्या ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांना’ साक्ष देऊ शकतो?
३ ‘वरिष्ठ अधिकारी’ असलेल्या पुरुषांना साक्ष दिल्याचे दुरगामी परिणाम होऊ शकतात. (१ तीम. २:१, २) उदाहरणार्थ, यहोवाच्या दूताने फिलिप्पाला कांदके राणीच्या सर्व संपत्तीवर “मोठा अधिकारी” असलेल्याबरोबर बोलायला सांगितले. तो अधिकारी “यशया संदेष्ट्याचा गंथ्र” वाचत असल्याचे फिलिप्पाने ऐकले व त्याला येशूविषयीची सुवार्ता सांगितली. हा इथियोपियन अधिकारी शिष्य बनला व आपल्या मायदेशी जाताना सर्वांना सुवार्ता सांगत गेला. त्याने कदाचित राणीला व सुवार्ता ऐकण्याची कमी संधी मिळालेल्या तिच्या सभेतील इतर अधिकाऱ्यांनाही साक्ष दिली असावी.—प्रे. कृत्ये ८:२६-३९.
४. जास्तीत जास्त पुरुषांना सुवार्ता ऐकण्याची संधी मिळावी म्हणून आपण काय करू शकतो?
४ अधिकाधिक पुरुषांना साक्ष कशी द्यावी? दिवसा अनेक पुरुष कामाला जातात त्यामुळे तुम्ही संध्याकाळी, शनिवार-रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी क्षेत्रात जास्त वेळ सेवा करण्याची आखणी करू शकता का? व्यापारक्षेत्रात नियमित रितीने प्रचारकार्य केल्याने सहसा घरी न सापडणाऱ्या पुरुषांना साक्ष देण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. बांधव त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पुरुषांना अनौपचारिक साक्ष देण्याचा खास प्रयत्न करू शकतात. घरोघरचे प्रचारकार्य करताना खासकरून नेहमी नेहमी प्रचारकार्य केले जाते अशा क्षेत्रात कार्य करताना बांधव एखादवेळी, घरात कोणी पुरुष आहेत का याची चौकशी करून त्यांच्याशी बोलू शकतात.
५. राज्यसंदेशाला चांगला प्रतिसाद देणाऱ्या एखाद्या पुरुषाची पुनर्भेट मिळते तेव्हा बहिणीने काय केले पाहिजे?
५ एखाद्या बहिणीला जर सत्याबद्दल आस्था दाखवणारा पुरुष भेटला असेल तर त्याची पुनर्भेट करताना तिने एकटे जाऊ नये. ती तिच्या पतीसोबत किंवा इतर प्रचारक भावासोबत जाऊ शकते. तो आस्थेवाईक पुरुष प्रगती करत असेल तर ती एखाद्या प्रौढ भावाला त्याची पुनर्भेट घेण्यास सांगू शकते.
६. “अधिक लोक मिळविण्यासाठी” आपण प्रेषित पौलाचे अनुकरण कसे करू शकतो?
६ पुरुषांना आवडतील असे विषय निवड: प्रेषित पौलाने “अधिक लोक मिळविण्यासाठी” त्याच्या श्रोत्यांना समजून घेतले व त्यानुसार त्याच्या सादरतेत बदल केला. (१ करिंथ. ९:१९-२३) त्याप्रमाणे आपणही आपल्याला भेटणाऱ्या पुरुषांना कोणते विषय आवडतील याचा विचार करून तशी तयारी करू शकतो. उदाहरणार्थ पुरुषांना आर्थिक समस्येची, चांगल्या सरकाराची, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी नेहमी असते. जीवनाच्या उद्देशाबद्दल, पृथ्वीच्या भवितव्याबद्दल आणि देव दुःखाला अनुमती का देतो या विषयाबद्दलही त्यांना आवड असू शकते. आपण सादरता तयार करताना या सर्व गोष्टींचा आधीपासूनच विचार केला तर राज्यसंदेश चांगला प्रकारे ऐकला जाईल.—नीति. १६:२३.
७. सत्यात नसणारा पती जेव्हा सभेला येतो तेव्हा मंडळीतील सर्वजण त्याच्यावर सकारात्मक प्रभाव कसा पाडू शकतात?
७ सत्यात नसलेल्या पतींना मदत करण्यात पुढाकार घ्या: सत्यात नसलेल्या पतीवर त्यांच्या ख्रिस्ती पत्नीच्या उत्तम उदाहरणाचा नेहमीच चांगला प्रभाव पडत असला तरी मंडळीतील इतरांचाही त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. (१ पेत्र ३:१-४) सत्यात नसणारा पती आपल्या पत्नीसोबत सभेला येतो तेव्हा मंडळीत त्याचे प्रेमळपणे स्वागत केले जाते. ती त्याच्यासाठी एक जबरदस्त साक्ष ठरू शकते. सत्याबद्दल त्याला थोडीफार तरी आस्था आहे हे त्याच्या सभेला येण्यावरून दिसते व तो कदाचित बायबल अभ्यास देखील स्वीकारू शकतो.
८. सत्यात नसलेल्या पण सत्याबद्दल थोडी आवड दाखवणाऱ्या पतींना ख्रिस्ती बांधव कशी मदत करू शकतात?
८ दुसरीकडे पाहता काही पतींनी सुरूवातीला बायबलमध्ये थोडी आस्था दाखवली असेल व आता ते त्यांना जे बांधव आवडतात त्याच्यासोबत बायबलवर चर्चा करायला तयार असतील. एका मंडळीतील बांधव त्यांच्या मंडळीतील एका बहिणीच्या कुटुंबाला भेट द्यायचे तेव्हा आवर्जून तिच्या सत्यात नसलेल्या पतीसोबत त्याच्या आवडत्या विषयांवर बोलायचे. बोलता बोलता ते त्यांची चर्चा बायबल विषयांकडे वळवायचे. याचा परिणाम असा झाला की आज तो पती सत्यात आहे. दुसऱ्या एका बांधवाने अशाच एका सत्यात नसणाऱ्या पण मैत्रीपूर्ण असणाऱ्या पतीला त्याच्या घराचे कुंपन बांधायला मदत केली. अशा प्रकारे वैयक्तिक आस्था दाखवल्याने त्याचा बायबल अभ्यास सुरू आला. (गलती. ६:१०; फिलिप्पै. २:४) जर तुम्ही ख्रिस्ती बांधव आहात तर सत्यात नसणाऱ्या पतींना सत्यात यायला तुम्ही मदत करू शकाल का?
९. ख्रिस्ती पुरुषांना प्रशिक्षण दिल्याने काय फायदा होतो?
९ ख्रिस्ती पुरुषांना भविष्यातील जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार करणे: राज्य संदेशाला प्रतिसाद देणारे व यहोवाच्या सेवेत जबाबदारी स्वीकारण्यास तयार असणारे पुरुष मंडळीतील ‘मानवरूपी देणग्यांपैकी’ एक ठरू शकतात. हे ख्रिस्ती वडील यहोवाच्या लोकांसाठी आपल्या क्षमता व ताकद खर्च करतात. (इफिस. ४:८, NW; स्तो. ६८:१८) ते स्वेच्छेने व उत्साहाने मंडळीची काळजी घेतात. (१ पेत्र ५:२, ३) बांधवासाठी ते खरोखरच किती मोठा आशीर्वाद आहेत.
१०. पौलाला मदत करण्यासाठी हनन्याने जी मेहनत घेतली त्याचा फायदा अनेकांना कसा झाला?
१० उदाहरणार्थ एके काळी ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा शौल “परराष्ट्रीयांचा प्रेषित” बनला. (रोम. ११:१३) शौल छळ करणारा होता म्हणून सुरुवातीला शिष्य हनन्या त्याला प्रचार करायला नाखुष होता. पण हनन्याने प्रभूचे मार्गदर्शन स्वीकारले व तो शौलाशी बोलला. हाच शौल नंतर प्रेषित पौल बनला. पुढे अनेक वर्षांपर्यंत, हजारो लोकांना पौलाच्या प्रचाराचा फायदा झाला व देवाच्या वचनात लिहून ठेवण्यात आलेल्या त्याच्या पत्रांपासून कोट्यावधी लोकांना आज फायदा होत आहे.—प्रे. कृत्ये ९:३-१९; २ तीम. ३:१६, १७.
११. पुरुषांना साक्ष देण्यासाठी आपण आवश्यक बदल करण्यास का तयार असले पाहिजे?
११ पुरुषांना प्रचार करण्यासाठी आपल्याला कितीही बदल करावे लागले तरी आपण ते करण्यास तयार राहूया. हा उद्देश साध्य करत असताना यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आपण जे परिश्रम घेऊ त्यावर त्याचे आशीर्वाद असतील व राज्य संबंधीच्या कार्याची तो काळजी घेईल याची खात्री बाळगू शकतो.