नोव्हेंबर १ च्या सप्ताहाचा आराखडा
नोव्हेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. १४ परि. १०-१४, पृ. १८८-१८९ वरील चौकोन, परिशिष्ट २५४-२५५
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: पहिला इतिहास १६-२०
क्र. १: पहिला इतिहास १७:१-१०
क्र. २: सहानुभावी आणि समजूतदार असा (fy पृ. १७६, १७७ परि. ९, १०)
क्र. ३: खऱ्या ख्रिश्चनांनी दूर राहिले पाहिजे अशा गोष्टींबद्दल शास्त्रवचनांतील इशारे
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: निरनिराळ्या परीक्षांचा सामना करणे. आमची राज्य सेवा ऑक्टोबर २००७, पृष्ठ ९ परिच्छेद २ ते पृष्ठ १० वरील परिच्छेद ४ पर्यंत आधारित भाषण. एका अशा प्रचारकाची मुलाखत घ्या आणि त्याला विचारा की, कोणती गोष्ट त्याला गंभीररीत्या आजारी असूनसुद्धा आवेशाने प्रचार कार्य करत राहण्यास मदत करते?
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: नोव्हेंबर महिन्यात नियतकालिक सादर करण्याची तयारी करा. चर्चा. नियतकालिकेतील माहितीची एक किंवा दोन मिनिटात उजळणी करा. एक किंवा दोन लेख निवडा आणि सादरतेत वापरता येतील असे प्रश्न आणि शास्त्रवचन सुचवण्यास श्रोत्यांना सांगा. नियतकालिक कसे सादर करावे याचे प्रात्यक्षिक दाखवा.