ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
ऑक्टोबर २५, २०१० ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, सप्टेंबर ६ ते ऑक्टोबर २५, २०१० दरम्यानच्या आठवड्यांमधील नेमणुकींद्वारे आपण जे काही शिकलो त्या साहित्यावर आधारित ही उजळणी घेतील.
१. राजा अजऱ्या (उज्जीया) याच्या जीवनाचे परीक्षण केल्यावर आपण कोणता धडा शिकतो? (२ राजे १५:१-६) [w९२ ६/१ पृ. ३१-३२]
२. दुसरे राजे १३:२०, २१ मध्ये उल्लेखण्यात आलेला चमत्कार एखाद्या व्यक्तीच्या अवशेषांना किंवा तिच्या वस्तूंना पूजनीय मानण्याचे समर्थन करतो का? [w०५ ८/१ पृ. ११ परि. ३]
३. हिज्कीयाने ईजिप्तबरोबर संधान बांधले होते का? (२ राजे १८:१९-२१, २५) [w०५ ८/१ पृ. ११ परि. ५]
४. यहोवा आपला उद्देश ‘घडवितो’ असे का म्हणण्यात आले आहे? (२ राजे १९:२५) [w९९ ८/१५ पृ. १४ परि. ३]
५. यहोवा यहुदाला ‘क्षमा करण्यास तयार’ का नव्हता? (२ राजे २४:३, ४) [w०५ ८/१ पृ. १२ परि. १]
६. पहिले शमुवेल १६:१०, ११ येथे, दावीद इशायाचा आठवा पुत्र होता असे म्हटले आहे तर एज्रा पुस्तकात त्याला इशायाचा सातवा पुत्र म्हटले आहे. असे का? (१ इति. २:१५) [w०५ १०/१ पृ. ९ परि. १]
७. यार्देनेच्या पूर्वेकडील लोकांचे आपण अनुकरण कसे करू शकतो? (१ इति. ५:१०, १८-२२) [w०५ १०/१ पृ. ९ परि. ७]
८. लेवी द्वारपाळांकडून आपण कोणता धडा शिकू शकतो? (१ इति. ९:२६, २७) [w०५ १०/१ पृ. ९ परि. ८]
९. पहिला इतिहास ११:११ या वचनात ठार मारलेल्यांची संख्या ३०० आहे पण दुसरे शमुवेल २३:८ मधील त्याच अहवालात ८०० आहे, असे का? [w०५ १०/१ पृ. १० परि. ३]
१०. पहिला इतिहास १३:११ येथे वर्णन करण्यात आलेली दाविदाची प्रतिक्रिया चुकीची का होती? [w०५ १०/१ पृ. ११]