घोषणा
◼ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज. आवड दाखवणाऱ्या घरमालकांना, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? या नवीन माहितीपत्रकासोबत सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास कोण आपल्याला मदत करेल? ही माहितीपत्रके देखील तुम्ही देऊ शकता. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. घरात मुले असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक देऊ शकता. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? जर घरमालकाकडे हे पुस्तक असेल तर, पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापण्यात आलेले किंवा १९९५ च्या आधी प्रकाशित करण्यात आलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक देता येईल.
◼ एप्रिल १८, २०११ पासून, मंडळीच्या बायबल अभ्यासात आपण सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकातून अभ्यास करणार आहोत. ज्या मंडळ्यांमध्ये या पुस्तकाचा साठा नाही त्या मंडळ्या आपल्या पुढील साहित्य मागणीच्या वेळी या पुस्तकाचा साठा मागवू शकतात.