तुम्हाला परकीय भाषेतील प्रकाशन लगेचच हवे असल्यास
काही वेळा प्रचार कार्यात असे लोक भेटतात ज्यांना आपल्या मंडळीत उपलब्ध नसलेल्या भाषेतील प्रकाशने हवी असतात. जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल आणि जर तुमच्याकडे प्रिंटर असेल तर तुम्ही स्वतःच सुमारे ४०० भाषांमध्ये प्रकाशने प्रिंट करू शकता, हे तुम्हाला माहीत होते का? त्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील:
• www.watchtower.org या आपल्या अधिकृत वेबसाईटवर जा.
• मुख्य पृष्ठाच्या उजव्या बाजूला ठराविक भाषांची यादी दिली आहे. पृथ्वीच्या चित्रावर क्लिक केल्याने बाकीच्या भाषांचीही यादी तुम्हाला दिसेल.
• ज्या भाषेत तुम्हाला प्रकाशन हवे आहे त्यावर क्लिक करा. तुम्ही प्रिंट करू शकता अशा प्रकाशनांची, जसे की पत्रिका, माहितीपत्रके आणि लेख यांची यादी दाखवणारे पान उघडेल. तुम्ही निवडलेल्या भाषेतील हे पान असल्यामुळे, तुम्हाला हवी असलेली शीर्षके दिसली नाहीत तरी काही हरकत नाही.
• कोणत्याही मजकूरावर क्लिक करा. तुम्हाला हवी असलेली माहिती स्क्रिनवर येईल आणि तुमच्या ब्राऊजरवरील प्रिंट फिचरने तुम्ही प्रिंटआउट काढू शकता.
आपल्या वेब साईटवर फक्त काही प्रकाशने उपलब्ध आहेत. जादा प्रकाशने मंडळीद्वारे मिळू शकतात. घरमालकाला आवड असल्याचे निश्चित झाल्यावर मग तुम्ही लिटरेचर काऊंटरवर तुम्हाला हवी असलेली प्रकाशनांची ऑर्डर देऊ शकता.