नियतकालिके कशी सादर कराल?
टेहळणी जुलै - सप्टेंबर
“जीवनात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. [तुमच्या क्षेत्रात सर्वसामान्य असलेल्या एकदोन समस्यांविषयी सांगा.] या समस्यांवर मात करायला देव आपल्याला मदत करू शकतो, असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा. घरमालक पुढे ऐकू व शास्त्रवचन पाहू इच्छित असेल तर संभाषण चालू ठेवा.] या एका मार्गाने देव आपली हिंमत वाढवून आपल्याला मदत करतो. [लूक ११:१३ वाचा.] पवित्र आत्मा म्हणजे काय आणि या शक्तीने आपल्याला कसा फायदा होतो, हे या नियतकालिकात समजावून सांगण्यात आले आहे.”
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“आज जगात इतकं दुःख का आहे, असा प्रश्न तुमच्या मनात कधी आला आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] पुष्कळ लोक विचारत असलेला प्रश्न एका व्यक्तीने कसा विचारला ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का? [घरमालक ऐकू इच्छित असेल तर स्तोत्र १०:१ वाचा.] देवाने अजूनपर्यंत दुःख का काढून टाकलेले नाही व यातून आपली मुक्ती करण्यासाठी तो काय करणार आहे याबद्दल शास्त्रवचनात काय म्हटले आहे ते या नियतकालिकात सांगितले आहे.”