क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
मार्च २०१०
या वर्षीच्या स्मारक विधीची उपस्थिती पाहून आपल्या सर्वांना अत्यानंद होत आहे! या समारंभाला, ८७,५३२ जण उपस्थित होते! गेल्या वर्षाच्या स्मारक विधीच्या तुलनेत ही १२ टक्क्यांनी वाढ आहे! आपल्याजवळ आनंद करण्याचे आणखी एक कारण आहे. मार्च महिन्यात पाच नवीन उच्चांक गाठण्यात आले होते! ३३,०८९ प्रचारकांनी ज्यांत २,९७४ सामान्य पायनियरांचाही समावेश होतो, क्षेत्र सेवेत भाग घेतला. या सर्वांनी मिळून, ६,४२,६०८ तास खर्च केले; २,१८,९०८ पुनर्भेटी दिल्या आणि ३७,७४८ गृह बायबल अभ्यास चालवले.