घोषणा
◼ साहित्य सादरता ऑगस्ट: मंडळीत उपलब्ध असलेली कोणतीही ३२ पानी माहितीपत्रके: देव खरोखर आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज. आवड दाखवणाऱ्या घरमालकांना, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? या नवीन माहितीपत्रकासोबत सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास कोण आपल्याला मदत करेल? ही माहितीपत्रके देखील तुम्ही देऊ शकता.
◼ सन २०११ चे शास्त्रवचनांचे परीक्षण करणे, कॅलेंडर आणि वार्षिकपुस्तक (फक्त इंग्रजीत) यांची ऑर्डर कृपया ऑक्टोबर १५, २०१० च्या आधी लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-१४) पाठवावी.
◼ सप्टेंबरपासून, विभागीय पर्यवेक्षकांच्या जाहीर भाषणाचा विषय: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून आपली दृष्टी वळवा” हा असेल.