ऑगस्ट २३ च्या सप्ताहाचा आराखडा
ऑगस्ट २३ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरे राजे ५-८
क्र. १: दुसरे राजे ६:८-१९
क्र. २: तुमच्या वैवाहिक बंधनाला पुनः बळकटी आणणे (fy पृ. १६५-१६७ परि. १०-१३)
क्र. ३: शारिरीक वासना एखाद्याचे दैवत कसे बनू शकते? (फिलिप्पै. ३:१८, १९)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: सप्टेंबर महिन्यात बायबल अभ्यास सुरू करा. श्रोत्यांबरोबर चर्चा. सप्टेंबर महिन्यात आपण खरोखरच आवड असलेल्या लोकांना पुन्हा भेटी देतो तेव्हा, बायबल काय शिकवते पुस्तक देऊन त्यांच्याशी त्यातून एक किंवा दोन परिच्छेदांची चर्चा करणार आहोत. हे कसे करता येऊ शकेल त्यावर काही मार्ग सुचवा. एक किंवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा. या वर्षी स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या पण बायबलचा नियमितरीत्या अभ्यास न करणाऱ्या लोकांवर आपले लक्ष केंद्रित करण्यास श्रोत्यांना उत्तेजन द्या.
२० मि: “तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!”—भाग १. परिच्छेद १-८ वर प्रश्न व उत्तराने चर्चा. एक किंवा दोन सूचनांचे प्रात्यक्षिक करून दाखवा.